वंदे मातरम् : देशभक्तीपर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सेलूतील नूतन विद्यालयाचा कार्यक्रम
सेलू : इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चलके, क्रांतीचा गर्जा जयजयकार, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे, या मातीच्या पुण्याईचा आदी देशभक्तीपर गीतांच्या ‘ वंदेमातरम् ‘ कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शनिवारी, १६ सप्टेंबररोजी सायंकाळी नूतन विद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, अतुल पाटील व तबला वादक गिरीश दीक्षित यांच्या संगीत संयोजनात हा कार्यक्रम झाला. उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, अजीज खाँ पठाण, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, नारायण सोळंके, संतोष पाटील, डी.डी.सोन्नेकर, किरण देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा गौरव गीत, नूतन संस्था गौरव गीत, सारे जहाँ से अच्छा,ने मजसी ने परत मातृभूमीला आदी गीते विद्यार्थ्यांनी सादर केली. वंदे मातरम् गीताने समारोप झाला. यामध्ये मानसी दलाल, समृद्धी राखे, वैष्णवी पिंपळगावकर, दर्शना जोशी, आर्या घांडगे, पलश बुक्तर, श्रुती कुलकर्णी, अनुष्का वाघ, ऋतुजा महाजन, शिवानी डहाळे, सोहम उंडे, अथर्व तोडकर, क्षितिज वानरे, सोहम नेवरेकर, शाश्वत संघई, तीर्थेश संघई, आनंद राऊत, विठ्ठल बोरसे, श्रेयश मस्के, कार्तिक सातपुते, सोहम मोताळे, बालाजी घोडके, रुद्र खरात, प्रतीक अंभोरे आदी बालकलाकारांनी सहभाग घेतला केली. तबल्यावर गिरीश दीक्षित यांनी साथसंगत केली. ध्वनी व्यवस्था केशव डहाळे यांनी सांभाळली. कार्यक्रमाला जेष्ठ गायक यशवंत चारठाणकर, डॉ.राजेंद्र मुळावेकर, आरती पांडव, रवि कुलकर्णी, प्राध्यापक ए.डी.कुलकर्णी, सुरेखा रामदासी यांच्यासह पालक, शिक्षकांची उपस्थिती होती. पी.टी.कपाटे, बाबासाहेब हेलसकर, उज्ज्वला लड्डा, सुनीता सांगुळे, काशीनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे, फुलसिंग गावीत, बाळू बुधवंत, सुनील तोडकर, आर.डी.कटारे आदींसह संयोजन समितीने पुढाकार घेतला.
Helical Stepwell : रेल्वे अधिकारी नीती सरकार यांनी केली वालूरच्या बारवाची पाहणी