तक्रारींसोबत मागण्यांचाही पाऊस; आमदार बोर्डीकरांच्या जनता दरबाराला सेलूत मोठा प्रतिसाद 

तक्रारींसोबत मागण्यांचाही पाऊस; आमदार बोर्डीकरांच्या जनता दरबाराला सेलूत मोठा प्रतिसाद 

नागरीकांचे प्रश्न तात्काळ सोडवा : आमदार बोर्डीकरांच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना 

सेलू : आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या वतीने सोमवारी, १८ सप्टेंबररोजी आयोजिण्यात आलेल्या जनता दरबारात सेलू तालुक्यातील नागरिकांनी अनेक तक्रारींसोबत मागण्यांचाही पाऊस पाडला. या वेळी सर्व संबंधित सरकारी, निम सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना आमदार बोर्डीकर यांनी दिल्या. 

सेलू बसस्थानक परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता हा जनता दरबार भरविण्यात आला होता. या वेळी महसूल विभागांतर्गत येणाऱ्या श्रावण बाळ योजनेच्या पगारी, शेतरस्त्याची कामे, राशनचे धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी, राशन कार्ड, महिला बचत गटाच्या महिलांची राष्ट्रीयकृत बँकेकडून होत असलेली अडवणूक आदींसह अनेक तक्रारी नागरिकांनी आमदार बोर्डीकरांसमोर मांडल्या. तक्रारी जाणून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आमदार बोर्डीकरांनी लगेच फोन करून तात्काळ समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या. साठगाव पाणीपुरवठा योजना, जलसंपदा विभागांतर्गत चाऱ्यांची कामे, वालूर येथील दर्ग्याला निधीची मागणी, शहरासह ग्रामीण भागातील स्मशान भूमीचे प्रश्न मार्गी लावणे, शहरातील नाली व रस्ते काम आदी मागण्यांही नागरिकांनी या वेळी केल्या. सेलूसह तालुक्यातील चारशे ते पाचशे नागरिकांनी आपली कैफियत या वेळी मांडली. जनतेचे कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार बोर्डीकर यांनी दिले. या वेळी बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, संजय लोया, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराव कदम, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, डॉ.ऋतुराज साडेगावकर, जयसिंग शेळके, विठ्ठल कोकर, कपिल फुलारी, गणेश सवणे आदींसह सरपंच, उपसरपंच, भाजप पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


लालबावटाचे सेलूत धरणे आंदोलन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!