AIMIM : सेलू तालुकाध्यक्षपदी ॲड.शेख वहिद; अबरार बेग शहराध्यक्ष

AIMIM : सेलू तालुकाध्यक्षपदी ॲड.शेख वहिद; अबरार बेग शहराध्यक्ष

सेलू : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या सेलू तालुकाध्यक्षपदी ॲड.शेख वहीद शेख हबीब, सेलू शहर अध्यक्षपदी पत्रकार अबरार बेग तसेच सेलू शहर उपाध्यक्षपदी शेख इब्राहीम शेख उस्मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी, १९ सप्टेंबररोजी एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲड‌.इम्तियाज खान यांनी ॲड.शेख वहीद शेख हबीब, पत्रकार अबरार बेग आणि शेख इब्राहीम शेख उस्मान यांना नियुक्ती पत्र दिले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी पक्षाचे कार्य सर्व सामान्य पोहचून पक्ष वाढविण्याचे प्रयत्न करावे, अशा सूचना नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत. यावेळी परभणी शहर अध्यक्ष शेख अखिल चरण सिंह ठाकुर, शेख असलम, शेख फैझान आदींची सह उपस्थिती होती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!