PDCC BANK : ग्राहकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी परभणी जिल्हा बँक सज्ज

PDCC BANK : ग्राहकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी परभणी जिल्हा बँक सज्ज

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार सुरेशराव वरपुडकर यांची माहिती

PDCC BANK : ग्राहकांना सेवासुविधा पुरविण्यासाठी  परभणी जिल्हा बँक सज्ज

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काळानुरूप बदलत आहे. आगामी काळात कृषीबरोबरच अकृषि कर्ज पुरवठा वाढविण्यावर बँक विशेष भर देणार आहे. सोबतच ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणे सर्वप्रकारच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाली आहे, असे बँकेचे अध्यक्ष आमदार सुरेशराव वरपुडकर यांनी सांगितले.
सोमवारी, १८ सप्टेंबररोजी जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वरपुडकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी बँकेचे संचालक माजी आमदार सुरेशराव देशमुख, भगवानराव वाघमारे, गणेशराव रोकडे, प्रेरणा वरपूडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कुरूंदकर, सरव्यवस्थापक आर.व्ही.मौजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
साडे अकरा लाखांवर खातेदार असलेल्या परभणी जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र परभणी, हिंगोली जिल्हा आहे. दोन्ही जिल्ह्यांत ३०३ शाखांच्या माध्यमातून ८७८ संस्थांना सेवा पुरविली जाते.‌ बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे सेवा देण्यात परभणी जिल्हा बँक मराठवाड्यात अग्रेसर ठरली आहे. आगामी काळात अधिकाधिक भर टाकण्यावर संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे, असे वरपुडकर यांनी सांगितले.
खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी जिल्हा बँक देत असलेल्या सुविधांबाबत वरपुडकर यांनी सांगितले की, २५ लाखांपर्यंत वैयक्तीक कर्ज योजना तसेच २५ लाखांचे अपघाती विमा कवच देण्यात येईल. २ लाखांपर्यत प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, तसेच २ लाखापर्यत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे विमा संरक्षण, एकाच वेळी सर्व शिक्षकांच्या वेतनाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ४० लाखांपर्यंत गृहकर्ज योजना, बायोमॅट्रीकद्वारे अनुदान वाटप, सर्व बँकांच्या एटीएममधून प्रतिदिवस ४० हजारापर्यंत रक्कम मर्यादा. लवकरच ५० लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज तसेच वेतनावर ओडीची सुविधा व नेट बँकींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय साडे चारशे मायक्रो एटीएम सुविधा लवकरच कार्यान्वित येणार असल्याचे वरपुडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, सेवा सुविधांविषयी परभणी जिल्हा बँकेच्या विविध शाखांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खातेदारांमध्ये जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. खातेदारांच्या भेटीगाठी घेऊन माहिती दिली जात आहे. विशेषत: मोठ्या संख्येने खातेदार असलेल्या शेतकरी, तसेच वेतनासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेकडे आकृष्ट झालेल्या खासगी शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांवरही जिल्हा बँकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे.


गिरीश लोडाया यांचे निधन; सेलूच्या सांस्कृतिक, क्रीडाक्षेत्रातील उमदा मार्गदर्शक हरपला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!