Ganeshotsav : रविवारपासून सेलूत गणेशोत्सव व्याख्यानमाला
व्याख्यान, परिसंवाद, एकांकिका आदी भरगच्च कार्यक्रम
ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकजागर घडवून आणणे या मुख्य उद्देशानेच गेल्या ६१ वर्षांपासून सेलू येथील गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजित केली जाते. विशेष म्हणजे वर्गणी गोळा केली जात नाही. आयोजनपूर्व सभेला उपस्थित नागरिक, पदाधिकारी व सदस्य स्वच्छेने आर्थिक योगदान देऊन व्याख्यानमालेचा खर्च भागवितात. स्वयंस्फूर्तीने अनेकजण यासाठी विविध माध्यमातून सहकार्य करीत सहभाग नोंदवितात.
सेलू जि.परभणी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथे रविवार ते बुधवार (२४ ते २७ सप्टेंबर) या कालावधीत ६२ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजिण्यात आली आहे. यानिमित्ताने व्याख्यान, परिसंवाद, एकांकिका आदी भरगच्च कार्यक्रम आहेत.
नूतन विद्यालयाच्या राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम आहेत. अध्यक्ष तथा मुख्याध्यापक नारायण सोळंके, समन्वयक अजित मंडलिक, काशीनाथ पल्लेवाड यांनी ही माहिती दिली. व्याख्यानमालेचे ६२ वे वर्ष आहे. गणेशोत्सव काळात ज्वलंत सामाजिक विषयांवर लोकप्रबोधन आणि स्थानिक वक्ते, साहित्यिक, नाट्य, संगीत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने व्याख्यानमाला आयोजित केली जाते. सेलूभूषण शंकरराव मंडलिक गुरुजींच्या पुढाकाराने ही व्याख्यानमाला सुरू झाली. पुढे चिटणीस गिरीश लोडाया यांनी २७ वर्षे नेटाने आणि तळमळीने हा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनात या वर्षी विविध कार्यक्रम होत आहेत. रविवारी, २४ सप्टेंबररोजी ” चांद्रयान-३” या विषयावर जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक रविशंकर झिंगरे (परभणी) यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी शिल्प निदेशक मिलिंद कंगले असतील. सोमवारी, २५ सप्टेंबररोजी ” मुलांचे रिल्स आणि पालकांचे रोल” या विषयावर परिसंवाद आहे. अथर्व सौदागर, विद्या इंगोले, ऋतुजा रोडगे या विद्यार्थ्यांसह डॉ.स्मिता देऊळगावकर, शिक्षक योगेश ढवारे यांचा सहभाग असेल. श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर अध्यक्षस्थानी असतील. मंगळवारी २६ सप्टेंबररोजी ” हैदराबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्यातील शिक्षण संस्थांचे योगदान ” या विषयावर शिक्षक तथा साहित्यिक सुरेश हिवाळे यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव डॉ.गंगाधर गळगे असतील. बुधवारी, २७ सप्टेंबररोजी विजय तेंडुलकर लिखित आणि रवी मुळावेकर दिग्दर्शित ‘थिफ पोलीस’ ही धम्माल विनोदी एकांकिका स्थानिक कलावंत सादर करतील. सूत्रधार प्राध्यापक ए.डी.कुलकर्णी आहेत. नाटकांमध्ये जेष्ठ नाट्य कलावंत रवि कुलकर्णी, रवि मुळावेकर, एन.एम.देशपांडे, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूरकर अशोक वाडकर, गीता मुळोवकर, मनिषा धर्माधिकारी, सीमा आष्टीकर, के.के.देशपांडे यांच्या भूमिका आहेत. उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार दिनेश झांपले यांची उपस्थिती राहणार आहे. माजी आमदार हरिभाऊ लहाने अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे एसबीआयचे व्यवस्थापक अनंत गावडे, प्रशांत उरणकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धनंजय भागवत, प्रा.देविदास ढेकळे, प्रणिता सोलापुरे, प्रीती सराफ, डॉ.राजेंद्र मुळावेकर, डॉ.विलास मोरे, मोहन बोराडे, गंगाधर कान्हेकर विविध कार्यक्रमांचे संयोजन करीत आहेत. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष नारायण सोळंके, समन्वयक अजित मंडलिक, काशीनाथ पल्लेवाड, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी, राजेश ढगे, लता गिल्डा, डॉ.कल्पना कुलकर्णी, उपाध्यक्ष किशोर जोशी, उपेंद्र बेल्लूरकर, बाबासाहेब हेलसकर, गणेश माळवे, संजय वाघ, रेवणअप्पा साळेगावकर, चंद्रशेखर नावाडे, शोभा कोरडे, जयश्री सोन्नेकर, प्रा.नागेश कान्हेकर, भगवान देवकते, डी.डी.सोन्नेकर, बी.टी.गजमल, शोभा ढवळे, बाबासाहेब चारठाणकर, सुधाकर नरळदकर, जयश्री सोनेकर, प्राध्यापक नागेश कान्हेकर, कल्याण पवार, महम्मद इलियास, संतोष खाडप, प्राध्यापक संजय पिंपळगांवकर, सहचिटणीस के.जी.कुलकर्णी, दिलीप डासाळकर, ललिता गिल्डा, सतीश बाहेती, सतीश नावाडे, गणेश माळवे, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी विटेकर, आर.डी.कटारे, रेवणअप्पा साळेगावकर, आनंद बाहेती, रुपा काला, प्रवीण माणकेश्वर, शरद ठाकर, मीरा बहिवाल, गुरुबसअप्पा पंचगल्ले, मंजुषा बोराडे, प्रशांत नाईक, विलास शिंदे, दुर्गादास कुलकर्णी, सदस्य एस.आर.देशपांडे, एन.जी.बंगाळे, वसुधा खारकर, रऊफखान पठाण, उज्ज्वला भाला, मधुरा खारकर, नीता मालाणी,चंदा मेहता, अनिता कुलकर्णी,नीता बलदवा, सविता कासट, मेघना चौधरी, मीना मालाणी, राजश्री शिवणकर, संगीता खारकर आदींसह पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.