बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा
सेलू तालुका दबाब गटाचे कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
सेलू जि परभणी : या वर्षीच्या हंगामात परभणी जिल्ह्यासह सेलू तालुक्यात शेतकऱ्यांनी कृषी आस्थापनाधारकांकडून घेतलेले बियाणे व औषधी बोगस निघाली. त्यामुळे अशा कृषी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी सेलू तालुका दबाव गटाने तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषिमंत्री यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाण, काष्टे, चव्हाण, दिलीप मगर, शेवाळे, रामचंद्र कांबळे, गुलाब पौळ, नारायण पवार, उद्धव सोळंके, अजित मंडलिक, इसाक पटेल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत