‘थिफ पोलिस’ एकांकिकेला रसिकांची भरभरून दाद

‘थिफ पोलिस’ एकांकिकेला रसिकांची भरभरून दाद 

सेलूतील गणेशोत्सव व्याख्यानमालेची उत्साहात सांगता

सेलू जि.परभणी : येथील गणेशोत्सव व्याख्यानमाले अंतर्गत बुधवारी, २७ सप्टेंबररोजी विजय तेंडुलकर लिखित ‘थिफ पोलिस’ एकांकिका सेलूतील स्थानिक कलावंतांनी सादर केली. या एकांकिकेला नाट्य रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.  सायंकाळी सहा वाजता उद्घाटन झाले. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे. माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काकडे, राजेंद्र लहाने, अनंत गावडे, प्रशांत उरणकर, प्रभाकर सुरवसे, संयोजक गंगाधर कान्हेकर, मोहन बोराडे आदींची उपस्थिती होती.

एकांकिकेत नाट्य कलावंतांनी सादर केलेल्या अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली. यामध्ये बेकार युवकाची भूमिका शशिकांत देशपांडे, प्रॉडक्शन मॅनेजर- रवि कुलकर्णी, कुटूंब- सीमा आष्टीकर, पेन्शनर -एन.एम. देशपांडे, नोकरीवाली मुलगी- मनिषा धर्माधिकारी, सोसायटी लेडी- गीता मुळावेकर, कम्युनिस्ट कार्यकर्ता -भालचंद्र गांजापुरकर, श्रीमंत- अतुल दातार, गार्ड- रवि मुळावेकर, मद्रासी व्यक्तिरेखा अजित मंडलिक व मोहन बोराडे यांनी साकारली. एकांकिकेचे दिग्दर्शन रवि मुळावकर यांनी केले. सूत्रधार म्हणून प्रा.ए.डी. कुलकर्णी होते. संगीत आदित्य मुळावेकर, प्रकाश योजना अनंत भंडारे, ध्वनी संयोजन केशव डहाळे व अश्वीन भंडारे, नेपथ्य रोहीणी कुलकर्णी, रंगभूषा अनिता कुलकर्णी यांची होती. दरम्यान चार दिवसीय गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या प्रसंगी राजेंद्र लहाने, अशोक काकडे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करीत गणेशोत्सव व्याख्यानमाला पदाधकारी, सदस्यांचे कौतुक केले.

'थिफ पोलिस' एकांकिकेला रसिकांची भरभरून दाद 

व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष नारायण सोळंके, समन्वयक अजित मंडलिक, काशीनाथ पल्लेवाड, संयोजक धनंजय भागवत, प्रा.देविदास ढेकळे, प्रणिता सोलापुरे, प्रीती सराफ डॉ.राजेंद्र मुळावेकर, डॉ.विलास मोरे, मोहन बोराडे, गंगाधर कान्हेकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी, राजेश ढगे, लता गिल्डा, डॉ.कल्पना कुलकर्णी, उपाध्यक्ष किशोर जोशी, उपेंद्र बेल्लूरकर, बाबासाहेब हेलसकर, गणेश माळवे, संजय वाघ, रेवणअप्पा साळेगावकर, चंद्रशेखर नावाडे, शोभा कोरडे, जयश्री सोनेकर, प्रा.नागेश कान्हेकर, भगवान देवकते, डी.डी.सोनेकर, बी.टी.गजमल, शोभा ढवळे, बाबासाहेब चारठाणकर, सुधाकर नरळदकर, जयश्री सोनेकर, प्राध्यापक नागेश कान्हेकर, कल्याण पवार, महंमद इलियास, संतोष खाडप, प्राध्यापक संजय पिंपळगांवकर, सहचिटणीस के.जी.कुलकर्णी, दिलीप डासाळकर, ललिता गिल्डा, सतीश बाहेती, सतीश नावाडे, गणेश माळवे, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी विटेकर, आर.डी.कटारे, रेवणअप्पा साळेगावकर, आनंद बाहेती, रुपा काला, प्रवीण माणकेश्वर, शरद ठाकर, मीरा बहिवाल, गुरुबसअप्पा पंचगल्ले, मंजुषा बोराडे, प्रशांत नाईक, विलास शिंदे, दुर्गादास कुलकर्णी, सदस्य एस.आर.देशपांडे, एन.जी.बंगाळे, वसुधा खारकर, रऊफखान पठाण, उज्ज्वला भाला, मधुरा खारकर, नीता मालाणी, चंदा मेहता, अनिता कुलकर्णी, नीता बलदवा, सविता कासट, मेघना चौधरी, मीना मालाणी, राजश्री शिवणकर, संगीता खारकर आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.


नूतन शाळेने अनेक व्यक्तिमत्त्वे घडविली : डॉ.अपूर्व देशपांडे; सेलूच्या नूतन विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!