वीज पडून मायलेकीसह तिघांचा मृत्यू ; तीघे जखमी

वीज पडून मायलेकीसह तिघांचा मृत्यू ; तीघे जखमी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दुर्घटना

परभणी : गंगाखेड (जि.परभणी) तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि भेंडेवाडी येथे वेगवेगळ्या दोन घटनांत वीज पडून तीन ठार, तर तीन जखमी झाल्याची घटना घडली. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी ही माहिती दिली आहे.
गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजता शेतात काम करत असताना माय लेकीचा मृत्यू झाला असून, भेंडेवाडी येथील घटनेत १४ वर्षीय बालकाचा मृतामध्ये समावेश आहे.
डोंगरपिंपळा येथे शेतात काम करत असताना वीज पडून आई सविता विठ्ठल कतारे (४०) आणि मुलगी निकीता विठ्ठल कतारे (१८) यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यातीलच भेंडेवाडी येथे वीज पडून ओंकार किशन घुगे या १४ वर्षीय बालकाचा मृत्यू असून, त्याचा चुलता गोविंद विनायक घुगे (३०) हे जखमी झाले. तसेच सुनिता काशिनाथ शेप (४८) आणि रेणुका काशिनाथ शेप (२७) या मायलेकी जखमी झाल्या असल्याचे गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी कळविले आहे.


श्रीगणेशोत्सव : सेलूतील बाप्पांची मिरवणूक उत्साहात;वरुणराजाचीही हजेरी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!