स्वस्थ जीवनासाठी मैदानावर खेळा : जयप्रकाश बिहाणी

स्वस्थ जीवनासाठी मैदानावर खेळा : जयप्रकाश बिहाणी

सेलूतील क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद, ४३२ खेळाडूंचा सहभाग

सेलू : सदृढ शरीरातच सुदृढ मन व बुद्धीचा विकास होत असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आणि स्वस्थ जीवनासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, सेलू गटशिक्षणाधिकारी कार्यालय व नूतन महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बिहाणी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय जातपडताळणी अधिकारी गोरख राठोड, प्राचार्य गणेश सोळंके, क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ.के.के.कदम, प्रा.नागेश कान्हेकर, सतीश नावाडे, रामेश्वर तुरनर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर राजेश राठोड यांनी आभार मानले.
मैदानी क्रीडा स्पर्धेत १००, २००, ४००, ६००, ८०० मीटर धावणे, ४ बाय १००, ४ बाय ४०० रिले रेस , गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी आदी मैदानी स्पर्धेत ४३२ खेळाडूंनी सहभाग घेतला. पंच म्हणून प्रशांत नाईक, कैलास टेहरे, संभाजी बादाड, अमोल नंद, हनुमान नरवाडे, निलेश सोळंके, राजेश राठोड, संजय भुमकर, सुरज शिंदे, संतोष शिंदे, अमर सुरवसे, दिपक जोरगेवार, वेदांत बोचरे, बबलु घांडगे, सिध्देश्वर गवळी, ज्ञानदीप घांडगे यांनी काम पाहिले.


श्रीगणेशोत्सव : सेलूतील बाप्पांची मिरवणूक उत्साहात;वरुणराजाचीही हजेरी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!