सेलू नागरी सहकारी पतसंस्था : रौप्यमहोत्सवी सर्वसाधारण सभा उत्साहात
सभासदांनी १४ टक्के दराने लाभांश वाटप
अध्यक्ष सर्जेराव लहाने यांनी संस्थेच्या २५ वर्षाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा प्रवास नमूद केला. विशेष म्हणजे एका छोट्याश्या पतसंस्थेतर्फे एसबीआय कलेक्टच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही उल्लेखनीय बाब असल्याचे लहाने यांनी सांगितले.राजेंद्र लहाने यांनी मनोगतातून पतसंस्थेने गेल्या काही वर्षात घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सेलू जि.परभणी : सेलू नागरी सहकारी पतसंस्था रौप्यमहोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी, २९ सप्टेंबररोजी उत्साहात पार पडली. सभासदांना १४ टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक सर्जेराव लहाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, सहाय्यक निबंधक कार्यालय प्रतिनिधी विकास पिंगळे, उपाध्यक्ष कैलास कदम, संचालक नागेश देशपांडे, चंद्रशेखर नावाडे, दत्तात्रय नागरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी अध्यक्ष सर्जेराव लहाने यांनी संस्थेच्या २५ वर्षाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा प्रवास नमूद केला. विशेष म्हणजे एका छोट्याश्या पतसंस्थेतर्फे एसबीआय कलेक्टच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ही उल्लेखनीय बाब असल्याचे लहाने यांनी सांगितले. ३१ मार्च २३ अखेर १२२४ सभासदांच्या संस्थेचे खेळते भांडवल पाच कोटी रुपयांवर पोहोचले असून, चार कोटी रुपयांवर ठेवी, तर स्वनिधी ७३ लाखांवर आहे. चार कोटी रुपयांवर कर्ज वाटप, तर गुंतवणूक एक कोटी रुपयांवर गेली आहे. शिल्लक नफा १३ लाख ७१ हजार ३५० रुपये असून संस्था ऑडिटचा ‘अ ‘ वर्ग प्राप्त आहे. सभासदांना १४ टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येत आहे, असे अध्यक्ष लहाने म्हणाले. राजेंद्र लहाने यांनी मनोगतातून पतसंस्थेने गेल्या काही वर्षात घेतलेली झेप उल्लेखनीय आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. पूजा शिंदे-भेरे, अशोक उफाडे, रेवणअप्पा साळेगावकर, सुरेंद्र दिशागत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी सचिन विखे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड, तर संतोष ताल्डे यांनी आभार मानले. संचालक गणेश माळवे, सुरेश हिवाळे, निर्मला लहाने, शारदा टाकळकर, दिपाली राऊत, शिवाजी टाके, राजेभाऊ चव्हाण, शरद ठाकर यांच्यासह सभासदांची उपस्थिती होती.
३१ मार्च २०२३ अखेर सेलू नागरी सहकारी पतसंस्थेची सभासद संख्या १२२४, खेळते भांडवल ५,६६,७७,५८९ रुपये, वसूल भाग भांडवल ४७,१३,८०० रुपये, स्वनिधी ७३,८५, ६५८ रूपये आहे. एकूण ठेवी : ४,२९,६८,६७१ रुपये,, कर्जवाटप : ४,२७,८८,४४६ रुपये गुंतवणूक १,०४,३९,७६८ रुपये असून शिल्लक नफा १३,७१,३५० रुपये आहे. एनपीए ०.८४ टक्के असून संस्थेला ऑडिटचा अ वर्ग प्राप्त आहे. सभासदांना १४ टक्के दराने, लाभांश वाटप करण्यात येत आहे. अशी माहिती अध्यक्ष सर्जेराव लहाने यांनी यावेळी दिली.
स्वस्थ जीवनासाठी मैदानावर खेळा : जयप्रकाश बिहाणी; सेलूतील क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद