Shree Ganpati : श्रीगणपतींचा पालखी  सोहळा रंगला; हेलसमध्ये पारंपरिक उत्सव

Shree Ganpati : श्रीगणपतींचा पालखी  सोहळा रंगला; हेलसमध्ये पारंपरिक उत्सव

खासदार जाधवांसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती

Shree Ganpati : श्रीगणपतींचा पालखी  सोहळा रंगला; हेलसमध्ये पारंपरिक उत्सव

हेलस येथील प्राचीन हेमाडपंती श्री गणपती मंदिराच्या सभामंडपासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांनी सात लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. हा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याचे वचन दिले. खासदार जाधव, ए.जे.बोराडे, रामनाना पाटील खराबे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती झाली. ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

सेलू (जि.परभणी) : येथून पंचेवीस किलोमीटरवरील जालना जिल्ह्यातील हेलस येथील प्राचीन हेमाडपंती श्री गणपती मंदिरात गणेशोत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. यंदाही शुक्रवारी, २९ सप्टेंबररोजी मुख्य उत्सव, ‘श्रीं’ चा पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाआरतीला परभणी लोकसभा मतदारसंघ संघाचे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय (बंडू) जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
हेलस गावचे ग्रामदैवत श्री गणपती आहे. त्यामुळे गावामध्ये घरोघरी गणपती मूर्तीची स्थापनाच होत नाही. गणेशोत्सव निमित्ताने मंदिरात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ सहभागी होतात. या वर्षीही श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, श्री ज्ञानेश्वरी पारायण, लळीत, स्थानिक कलावंतांनी तीन नाट्यप्रयोग सादर केले. उत्सवाच्या निमित्ताने घरोघरी दिवाळीप्रमाणे पारंपरिक उत्साह दिसून आला. लेकीबाळी, पाहुणे, आप्तेष्ट, सग्यासोयर्‍यांनी घरे भरून गेली होती.श्रीमद् भागवत ग्रंथाच्या आणि ‘श्रीं’ च्या पालखी मिरवणुकीच्या स्वागतासाठी दारोदारी रस्त्यावर सडा शिंपून रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी साडेबाराच्या सुमारास महाआरती झाली. या वेळी खासदार संजय जाधव, ए.जे.बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाना खराबे पाटील, मंदिराचे अध्यक्ष दीपक खराबे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. आरतीनंतर महाप्रसाद झाला. त्यानंतर वरूणराजाही बरसला. सायंकाळी पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पंचक्रोशीतील भजनी मंडळे ( दिंडी) भजन, गवळणी, भारुडे सादर करून चैतन्य निर्माण केले. शनिवारी पहाटेपर्यंत सोहळा रंगला. दहीहंडीने उत्सवाची सांगता झाली.


सेलू नागरी सहकारी पतसंस्था : रौप्यमहोत्सवी सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १४ टक्के दराने लाभांश वाटप

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!