Brhmakumaries : ब्रह्माकुमारींचा समर्पण सोहळा उत्साहात
सेलूतील कार्यक्रमात मान्यवरांसह ब्रह्माकुमारी परिवाराची मोठी उपस्थिती, बहारदार नृत्यांनी भरली रंगत
परभणी येथील पांडुरंग व शारदा दाम्पत्याच्या तीनही कन्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या ईश्वरीय सेवेत समर्पित आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून सेवेत असलेल्या तिसऱ्या कन्या रचना बहेन यांनीही जून महिन्यामध्ये समर्पण केले. याच वेळी एरंडेश्वर येथील पंढरीनाथ व अरुणा दाम्पत्याच्या ब्रह्माकुमारी राधा बहेन यांनीही संपूर्ण जीवन ईश्वरीय सेवेला वाहून घेतले आहे. रचना व राधा बहेन खर्या अर्थाने पांडुरंग, पंढरीनाथांच्याचरणी लीन झाल्या.अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
सेलू जि.परभणी : ब्रह्माकुमारी रचना बहेन, परभणी आणि ब्रह्माकुमारी राधा बहेन, सेलू यांनी संपूर्ण जीवन ईश्वरीय कार्यासाठी समर्पित केले. यानिमित्ताने परभणी जिल्ह्यातील सेलू येथे रविवारी, एक ऑक्टोबररोजी आयोजित ईश्वरीय समर्पणाचा आनंद सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने श्री साई नाट्य मंदिरात हा सोहळा आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, डॉ.शिवदासभाई शिंदे, पांडुरंगभाई, शारदामाता, पंढरीनाथभाई अरुणामाता, कौशल्या बोराडे, विजया बोराडे, उर्मिला बोराडे, ब्रह्माकुमारी अर्चना बहेन, सविता बहेन, अनिता बहेन, योगिता बहेन, रंजना बहेन, सीमा बहेन, वैशाली बहेन आदींची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ब्रह्माकुमारी रचना आणि राधा बहेन यांनी शिवपिंडीला पुष्पहार अर्पण करुन समर्पित जीवनाच्या प्रवासातील भावानुभव व्यक्त केले. अर्चना बहेन, कौशल्या बोराडे, विनोद बोराडे आदींसह मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ‘जीवनात अध्यात्मिकतेचे महत्व’ या विषयावर शिवदासभाई यांनी मार्गदर्शन केले. अनिता बहेन यांनी ईश्वरीय सेवेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी श्वेता, ऋतुजा, स्वरा बरसाले, ऋतुजा जोशी, नम्रता, ममता मिटकरी, जिजाई, अहिल्या मोगल, स्वरा चव्हाण, अवनी, तक्षशिला, विराज, ज्ञानराज यांनी विविध नृत्ये सादर करून सोहळ्यामध्ये रंगत भरली. प्रास्ताविक सविता बहेन यांनी केले. सूत्रसंचालन संचालन सीमा बहेन यांनी केले. वैशाली बहेन यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सारिका बहेन, दिव्या बहेन, जया बहेन आदींसह परभणी, सेलू, पाथरी, मानवत, एरंडेश्वर, शिंदे टाकळी, सातोना, वालूर येथील ब्रह्माकुमारी परिवार तसेच नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Swachhata Hi Seva : मोहीम लोकचळवळ व्हावी : डॉ.संजय रोडगे; सेलू बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम