‘ एक मनाने,एकजुटीने आयुष्य जगा ‘

‘ एक मनाने,एकजुटीने आयुष्य जगा ‘

सेलूतील कार्यक्रमात पंजाबचे शाही इमाम उस्मान लुधियानवी यांचे आवाहन

सेलू जि.परभणी : पंजाब राज्यातील शाही इमाम मौलाना हझरत मोहम्मद उस्मान साहब लुधियानवी यांच्या धार्मिक व्याख्यानाचे सेलू शहरातील रेल्वस्थानकाजवळील मदिना मस्जिद येथे रविवारी, आठ ऑक्टोबररोजी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना इमाम म्हणाले की, जगातील सर्वात मोठा धर्म मानवतेचा धर्म आहे. गोरगरीब गरजूंना मदत करतांना जात पाहू नका. सर्वजण श्रेष्ठ आहेत. आपापसातले मतभेद बाजूला सारून, एक मनाने एकजुटीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा.
अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी होते. याप्रसंगी मौलाना उस्मान लुधीयानवी म्हणाले, की मुस्लिम समाजात जे मनुष्य निराधारांना आधार देत नाहीत. दान धर्म करत नाहीत. मदत करत नाहीत. अशा माणसाने आयुष्यभर केलेल्या अल्लाहची इबादत त्याच्या तोंडावर फेकली जाणार आहे. याची जाणीव ठेवावी. आपापसातले मतभेद बाजूला सारून, एक मनाने एकजुटीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत जीवन जगत अल्लाह पाकची ईबादत, पाच वेळा नमाझ पठण, इस्लाम धर्मगुरू पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीची अंमलबजावणी, उलेमा-ए-दिन यांचा आदर आदी अनेक धार्मिक कार्यासंबंधी उपदेशासह इमाम यांनी आवाहन केले‌. कार्यक्रमासाठी याहिया खान, सय्यद ईमरान यांच्यासह सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले. दरम्यान, सेलू शहरातील रहेमान नगर भागात नवीन मस्जिद बांधकामाचे उद्घाटन पंजाब राज्याचे शाही ईमाम मोहम्मद उस्मान लुधियानवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर शाही ईमाम उस्मान लुधीयानवी यांनी जगातील सर्व धर्मीयांच्या सुख शांतीसाठी दुआ मागितली.


Saibaba Bank : सेलूतील साईबाबा बँकेचा दहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मान

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!