OBC Reservation : ‘ओबीसीं’ चे १६ ऑक्टोबरला धरणे आंदोलन
सेलूतील बैठकीत ठराव
सेलू : सध्या राज्यात चालू असलेल्या घडामोडींबाबत तसेच ओबीसी आरक्षणाबाबत ध्येय धोरण ठरवण्यासाठी, विचारविनिमय करण्यासाठी सर्व समाज बांधवांची एक व्यापक बैठक येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृहात पार पडली. १६ ऑक्टोबररोजी धरणे आंदोलन करण्याचा ठराव यावेळी एकमताने घेण्यात आला.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नानासाहेब राऊत, प्रकाश मुळे, गणेश नाईकवाडे, महेमुद शेख, पवन कटारे, ॲड.शिवाजी चौरे, ॲड.प्रभाकर गिराम, ॲड.विष्णू ढोले, विनोद तरटे, भागवत दळवे, भारत इंद्रोके, किशोर कारके, बाळू काजळे, दिलावर शेख, गोपाळ बोकन, योगेश कथले, माऊली राऊत, जगन कटारे, राजेभाऊ ढगे, गणेश गोरे यांच्यासह तालुक्यातील व शहरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Saibaba Bank : सेलूतील साईबाबा बँकेचा दहाव्यांदा बँको पुरस्काराने सन्मान