केमापूर येथील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध उपक्रमांमध्ये मुले झाली दंग

केमापूर येथील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध उपक्रमांमध्ये मुले झाली दंग

सेलू जि.परभणी : परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा. या उद्देशाने आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध उपक्रमांमध्ये मुले दंग झाल्याचे दिसून आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी,९ ऑक्टोबररोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक शरद ठाकर, नारायण अष्टकर, दगडोबा माघाडे, कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर उपस्थित होते. प्रास्ताविक शरद ठाकर यांनी केले.

मोबाईल व्यसनापासून दूर राहण्यासाठी व वाचन संस्कृती रुजवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे महत्त्वाचे असल्याचे यावेळी ठाकर यांनी सांगितले. या एकदिवशीय कार्यशाळेत पाटणकर यांनी बालकांच्या आवडी ओळखून विविध खेळ, कागदी वस्तू, हस्तकला, ग्रीटिंग कार्ड, वारली चित्रकला, सुतळी काम, मुखवटे बनवणे, टाळ्यांचे प्रकार या माध्यमातून बालकांचे मनोरंजन केले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन प्रणिता गाडे यांनी केले. आभार प्रभावती घुगे यांनी मानले. कार्यशाळेस होमिओपॅथिक अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा.शिवा आयथॉल व डॉ.पवन चांडक यांचे सहकार्य लाभले.

केमापूर येथील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध उपक्रमांमध्ये मुले झाली दंग

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!