निर्भय बनो : सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांचे आज सेलूत व्याख्यान
संविधान बचाव समितीच्या वतीने आयोजन, उपस्थित राहण्याचे आवाहन
सेलू जि.परभणी : देशातील ज्वलंत वर्तमान राजकीय व सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने परखड आणि जळजळीत वास्तव मांडणारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राजकीय विश्लेषक डॉ.विश्वंभर चौधरी (पुणे) यांचे बुधवारी, ११ ऑक्टोबररोजी ‘निर्भय बनो’ व्याख्यान आयोजिण्यात आले आहे.
‘निर्भय बनो’ चळवळीला बळ देण्याच्या उद्देशाने संविधान बचाव समिती सेलूच्या वतीने साई नाट्य मंदिरात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होत आहे. अध्यक्षस्थानी रामकृष्ण शेरे पाटील असतील. स्वागताध्यक्ष शेख महेमुदसर यांची उपस्थिती राहणार आहे. सेलू शहर व तालुक्यातील संवेदनशील जागरूक नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन दत्तूसिंग ठाकूर, ॲड.विष्णू ढोले, जाहेद घौरी, श्रीनिवास उघडे के.डी.वाघमारे, रामेश्वर पौळ, सुनील गायकवाड, शेख साजीद, जकी सर, अमजद बागवान, शेख नफीस, दत्ता श्रावणे, बापू खनपटे, विश्वास शेरे, शिवाजी रणखांबे, राजीक कुरेशी, बापू धापसे, सोहेब जमीनदार, शेख सिराज व संयोजन समितीने केले आहे.
अ.भा.मराठी पत्रकार परिषद : एस.एम.देशमुख साधणार सेलूतील पत्रकारांशी संवाद; आज कार्यक्रम