अ.भा.मराठी पत्रकार परिषद : एस.एम.देशमुख साधणार सेलूतील पत्रकारांशी संवाद; आज कार्यक्रम
सेलू जि.परभणी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुबंईचे मुख्य विश्वस्त तथा ज्येष्ठ पत्रकार, मार्गदर्शक एस.एम.देशमुख यांचा बुधवारी, ११ ऑक्टोबररोजी सेलू येथे कार्यक्रम आहे. यानिमित्ताने सेलू तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांशी एस.एम.देशमुख संवाद साधणार आहेत. पत्रकारांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
मराठी पत्रकार संघ, सेलूच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेलूतील शासकीय विश्रामगृह व्हॉलमध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आहे. ग्रामीण पत्रकारांना पत्रकारिता करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पत्रकार संरक्षण कायदा जरी केला गेला तरी त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात होत नाही. तसेच अनेक जाचक अटीमुळे ग्रामीण पत्रकाराला अजूनही पत्रकार पेन्शनचा लाभ मिळू शकला नाही. अशा विविध प्रश्नांवर यामध्ये संवाद साधला जाणार आहे. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बांधवानी या संवाद कार्यक्रमात उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेलू मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव मोहसीन अहमद, डिजिटल मिडिया संघटनेचे सेलू तालुकाध्यक्ष किशोर कटारे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
निर्भय बनो : सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी यांचे आज सेलूत व्याख्यान