डॉ.पारनेरकर महाराज स्मृती पुरस्कार : महादेव आगजाळ यांना ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार जाहीर

डॉ.पारनेरकर महाराज स्मृती पुरस्कार : महादेव आगजाळ यांना ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार जाहीर

विद्यासागर डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत २१ ऑक्टोबरला पारनेर येथे वितरण

सेलू जि.परभणी : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव आगजाळ यांना डॉ.पारनेरकर महाराज स्मृती ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे.
पारनेर (जि.नगर) येथील डॅा.पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दरवर्षी सरस्वती महोत्सवात प्रदान करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ग्रंथमित्र, ग्रंथालय भूषण सेवाव्रती व ग्रंथोपजिवी या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी, १० ऑक्टोबररोजी करण्यात आली आहे. या वर्षी २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये पारनेर येथे सरस्वती महोत्सव होत आहे. शनिवारी, २१ ऑक्टोबररोजी विद्यासागर डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगजाळ यांना डॉ.पारनेरकर महाराज स्मृती ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारबाबत पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष ॲड.गुणेश वि.पारनेरकर, सचिव तिलोत्तमा सुरेश गोडबोले यांनी कळविले आहे.‌ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रंथपाल महादेव आगजाळ यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!