सरकारची पत्रकार सन्मान योजना फसवी : एस.एम.देशमुख

सरकारची पत्रकार सन्मान योजना फसवी : एस.एम.देशमुख

सेलूत पत्रकार संवाद कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती

सेलू जि.परभणी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर सरकारने सुरू केलेली पत्रकार सन्मान योजना ही फसवी आहे. या योजनेतील अनेक पत्रकारांचे अर्ज अजूनही धूळखात पडून आहेत, पत्रकारासाठी असलेली शासकीय आरोग्य योजना देखील नियमांच्या कचाट्यात अडकून पडली आहे, असे मत परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
येथील शासकीय विश्रामगृहावर बुधवारी, ११ ऑक्टोबररोजी सेलू पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.  त्या वेळी देशमुख बोलत होते. बीड जिल्हाध्यक्ष विशाल सांळुखे, डिजिटल मीडिया संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, राज्य निवडणूक निरीक्षक सुरेश नाईकवाडे, रवी उबाळे, लक्ष्मण बागल आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले की, केवळ शासनाच्या योजनांवर पत्रकारांनी अवलंबून न राहता, सर्व परिषदेच्या पत्रकार सदस्यांच्या माध्यमातून पत्रकार निधी उभारावा. त्यातूनच गरजू पत्रकाराला आर्थिक मदत करता येईल. परिषदेच्या लढ्यातून पत्रकार संरक्षण कायदा तयार करून घेतला व कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. परंतु, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जात नाही, अशी खंत देखील देशमुख यांनी यावेळी बोलून दाखविली. पत्रकारांनी संघटित होऊन उठाव करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. ग्रामीण पत्रकारांच्या बळावरच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सतत लढत आहे. डिजिटल मीडियाला संघटनेसोबत घेणे अत्यंत गरजेचे आहे. उपेक्षित असलेल्या ग्रामीण पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली. वाघमारे, साळुंखे, नाईकवाडे यांनी पत्रकार संघटनाची आवश्यकता मनोगतातून मांडली.
प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सेलू पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव मोहसीन अहमद मामु यांनी केले. सूत्रसंचालन शिंदे यांनी केले, तर निसार अहेमद यांनी आभार मानले. परभणीचे लक्ष्मणराव मनोलीकर, दत्तात्रय कहाले, सुधाकर श्रीखंडे, विठ्ठल वडकुते, प्रभू दिपके, माणिक शिंदे, विलास घनसावंत, प्रमोद अंभुरे, पाथरी येथून माणिक घुंबरे आदींसह सेलू तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती.


डॉ.पारनेरकर महाराज स्मृती पुरस्कार : महादेव आगजाळ यांना ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार जाहीर

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!