इंदिरा एकादशी : महादेव महाराज बोचरे यांच्या कीर्तनाला प्रतिसाद
वालूर येथे कार्यक्रम, सद्गुरु श्री धुंडा महाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेचा उपक्रम
सेलू : वालूर येथील सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘एकादशी कीर्तन सेवा’ उपक्रमांतर्गत अंतर्गत इंदिरा एकादशीला मंगळवारी,१० ऑक्टोबररोजी महादेव महाराज बोचरे (बोरगाव) यांचे कीर्तन झाले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आयोजित कीर्तनामध्ये बोचरे महाराजांनी संत तुकोबारायांच्या अभंगावर कीर्तन केले. इंदिरा एकादशी व्रत कथा व महत्त्व विशद केले. संस्थेचे अध्यक्ष सुंदर महाराज पितळे, उपाध्यक्ष लक्ष्मण खरबे, मृदंगाचार्य नारायण महाराज तांबट, बाळाभाऊ मुंडे, बाळाभाऊ दराडे, श्रीरंगराव खरबे, देवराव अबुज, खंडूजी शिंदे, नागोराव गडदे, बाबासाहेब गिनगीने, शंकर शिंदे, वाल्मिक दराडे, समर्थ गिनगीने आदींनी साथसंगत केली. एकनाथ कटारे, शंतनू महाराज पाठक यांच्यासह श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.