नवरात्र महोत्सव : गुरुवारपासून सेलूतील महिलांसाठी श्रीजगदंबा माता मोफत दर्शन यात्रा

नवरात्र महोत्सव : गुरुवारपासून सेलूतील महिलांसाठी श्रीजगदंबा माता मोफत दर्शन यात्रा

विनोद बोराडे मित्रमंडळाचा उपक्रम, मोफत वाहन सुविधा

सेलू जि.परभणी : नवरात्र महोत्सवानिमित्त सेलू शहरातील सर्व महिला भगिनींना मंठा येथील श्री जगदंबा मातेचे दर्शन घडावे, या उद्देशाने माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने गुरुवारपासून (१९ ऑक्टोबर) श्रीजगदंबा माता दर्शन यात्रा सुरू होत आहे. याचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.‌

पाचव्या माळेपासून ते आठव्या माळेपर्यंत (दि.१९ ते २२ ऑक्टोबर २०२३) महिला भाविकांची जाण्या-येण्यासाठीची वाहन व्यवस्था श्री साईबाबा मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे. श्री साईबाबा मंदीर, महेश नगर ते मंठा व परत श्री साईबाबा मंदीर, असा दर्शन प्रवास राहील. सकाळी नऊ ते सायंकाळी चार असा दर्शन यात्रेसाठीचा वेळ आहे. फक्त महिला भगिनींसाठीच ही व्यवस्था केलेली आहे. मोफत दर्शन यात्रा प्रवासासाठी 8087205555, 9371718525, 9960160963 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे संयोजकांनी कळविले आहे.

 


वाचा : विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!