नवरात्र महोत्सव : श्री जगदंबा देवी दर्शन यात्रेला उत्साहात सुरुवात
सेलूतील विनोद बोराडे मित्रमंडळाचा उपक्रम
पंचक्रोशीतील मंठ्याची श्री रेणुका जगदंबा माता भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. डोंगरावरील मूळ पुरातन मंदिरामध्ये तांदळा स्वरूपातील उत्तरमुखी देवी विलोभनीय आहे. आठव्या माळेपर्यंत दर्शन यात्रा उपक्रम चालतो, असे संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी सांगितले.
सेलू जि.परभणी : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सेलू येथील विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने गेल्या १२ वर्षांपासून महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत, मंठा येथील सिद्धपीठ श्री रेणुका जगदंबा माता मोफत दर्शन प्रवास यात्रेचा शुभारंभ गुरुवारी, १९ ऑक्टोबररोजी सकाळी झाला. दरवर्षी शेकडो महिला यामध्ये सहभागी होत असतात.
श्री साईबाबा मंदिर परिसरात भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर व माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते विधीवत पूजनाने सुरुवात झाली. याप्रसंगी प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, राजू पटेल, शंकर राऊत, अरुण दौड, बालासाहेब सरकाळे, भारत काठवटे, गौतम धापसे, वहिद अन्सारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पंचक्रोशीतील मंठ्याची श्री रेणुका जगदंबा माता भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. डोंगरावरील मूळ पुरातन मंदिरामध्ये तांदळा स्वरूपातील उत्तरमुखी देवी विलोभनीय आहे. आठव्या माळेपर्यंत दर्शन यात्रा उपक्रम चालतो, असे संयोजक विनोद बोराडे यांनी सांगितले. सेलू्तील आठ ते दहा हजार महिला दरवर्षी सहभागी होतात. मंदिर पायथ्याला व सेलूतही मित्रमंडळाने तात्पुरते विश्रांती स्थळ उभारले आहे. चहापान व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, असे समन्वयक राजेंद्र पवार यांनी सांगितले. उपक्रमासाठी साईराज मित्रमंडळासह विविध समित्यांचे स्वयंसेवक पुढाकार घेत आहेत.