आई महोत्सव : गोहेगाव व डिग्रसवाडीच्या महिलांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

आई महोत्सव : गोहेगाव व डिग्रसवाडीच्या महिलांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम,वाहनाची मोफत व्यवस्था

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान व डॉ.संजय दादा रोडगे मित्र मंडळ यांच्या वतीने आई महोत्सवानिमित्त मंठा येथील रेणुका माता दर्शन कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी गोहेगाव व डिग्रसवाडी येथील महिलांना मोफत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. 

जिल्हा परिषद रवळगाव सर्कल मधील विविध गावातील महिलांना रेणुका माता देवी दर्शनाचा लाभ घडविण्यात येत आहे. यानिमित्ताने डॉ.सविता रोडगे यांनी महिलांशी संवाद साधला असता त्यांनी आपुलकीने दर्शन व प्रवासासंबधी विचारपुस केली. यावेळी सर्व महिलांना रेणुका मातेच्या प्रतिमा भेट देण्यात आली. चहापान व फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रा.महादेव साबळे, प्रभाकर उकलकर, दत्ताभाऊ मंगारे, सुदाम माने, प्रल्हाद गटकळ, सचिन वाडेकर, पठाण सिद्दीकी, बाबासाहेब कागदे, सोना वाघाळे, माऊली चौर, संजय गटकळ, परमेश्वर गायकवाड, गजानन गटकळ, विकास साकळकर ,विष्णु आबा चाळके, अशोक चाळके राधाकिसन जावळे, दत्ताभाऊ माने, बालासाहेब गटकळ, जगनराव गटकळ तसेच गोहेगाव व डिग्रसवाडी येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!