महाविकास आघाडी नेत्यांविरोधात भाजपाचे जोेडे मारो; सेलूतील क्रांतीचौकात जोरदार घोषणाबाजी

महाविकास आघाडी नेत्यांविरोधात भाजपाचे जोेडे मारो; सेलूतील क्रांतीचौकात जोरदार घोषणाबाजी

सेलू जि.परभणी : कंत्राटी भरतीचा निर्णय तात्कालीन महाविकास आघाडी (उबाठा) सरकारने घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महापाप केले होते. या विरोधात सेलू येथील क्रांती चौकात, शनिवारी २१ ऑक्टोबररोजी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्यावतीने  महाविकास आघाडी नेत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला ‘जोडे मारो’ मारून तीव्र निषेध नोंदविण्यात आला, तर दिशाभूल करणारी कंत्राटी भरती रद्द करून तरुणांची फसवणूक रोखणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारदेखील मानण्यात आले. दरम्यान, परभणीसह जिंतूर, पुर्णा शहरातही संतप्त पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले.

सेलू्तील क्रांती चौकात आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी तालुकाध्यक्ष ॲड दत्तराव कदम, ॲड. संजय लोया, कपील फुलारी, अशोक आंभोरे, शिवहरी शेवाळे, भागवत दळवे, गणेश काटकर, दगडोबा जोगदंड, अर्जून बोरुळ, रुपाली ठाकूर, संदीप बोकन, ॲड.रामेश्वर शेवाळे,  शिवाजी खेडकर ,अजय डासाळकर, अनिल पवार, मयूर वाघ, सुंदर गाडेकर ,पंजाब पौळ, लालू खाँ पठाण, रफिक बेलदार, गणेश सवणे,अँड,कृष्णा शेरे, ॲड.मुकुंद गजमल, बाळु काजळे, प्रकाश शेरे, नीरज लोया, गोविंद शर्मा, राजु सोळंके, विजय काष्टे, सुनील चव्हाण, अर्जुन चव्हाण, अजित मोगल, लक्ष्मण गायके, महेश कलालडे, अमोल भोसले, पांडू पांचाळ, सय्यद नियाझोद्दिन, रफिक बेलदार, लालू खान, बद्रुद्दिन अन्सारी आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरणाचा निर्णय घेऊन उलट्या बोंबा मारणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने परभणीसह जिंतूर, पुर्णा शहरातही जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
संतप्त पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला. परभणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, विलास बाबर आदींनी नेतृत्व केले. जिंतूरमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर, गंगाधरराव बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.‌ तालुकाध्यक्ष ॲड.विनोद राठोड, डॉ.पंडित दराडे, संगीता जाधव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पूर्णा शहरात ऋषिकेश सुकनर, भास्कर सुर्यभान जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!