Actress Sonalee Kulkarni :  ” मी सुंदर दिसते, कारण…”: सेलूतील महिलांशी सोनालीचा दिलखुलास संवाद

Actress Sonalee Kulkarni :  ” मी सुंदर दिसते, कारण…”: सेलूतील महिलांशी सोनालीचा दिलखुलास संवाद

दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या रासदांडिया स्पर्धेला मोठा प्रतिसाद, विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान


”मी सुंदर दिसते याचे कारण स्किन केअर नाही. तो तर कार्यक्रमापुरताच असतो. सुंदर दिसण्यासाठी महिलांनी शरीर व मनाची काळजी घेणे आवश्यक आहे. क्षेत्र कोणतेही असू द्या, कष्टशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही. स्वतःची काळजी घेण्याचेच आपण विसरतो. त्यामुळे प्रत्येकाने रोज अर्धा तास स्वतःसाठी देऊन व्यायाम, योगा, चालणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्या मातीतील भाजी-भाकरीनेच शरीर आणि मनाचे सौंदर्य खुलते. हेच माझ्याही सुंदर जीवनाचे रहस्य आहे. ”  असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


Actress Sonalee Kulkarni :  '' मी सुंदर दिसते, कारण...'': सेलूतील महिलांशी सोनालीचा दिलखुलास संवाद

सेलू जि.परभणी : येथील बोर्डीकर मैदानावर दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रास दांडिया स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी, 20 ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धेतील विजेत्यांना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी आयोजक तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, भावना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवरात्र महोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर असल्याचे मत आमदार मेघना बोर्डीकर यांनी या वेळी व्यक्त केले. रासदांडिया महोत्सवाला जिंतूरमध्ये तेरा वर्ष झाली. सेलूचे हे दुसरे वर्षे आहे. महिलांचा प्रतिसाद पाहून चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. नारीशक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही आमदार बोर्डीकर यांनी यावेळी बोलतांना दिली. पीएचडी प्राप्त शिक्षिका जयश्री सोन्नेकर यांच्यासह संगीता कान्हेकर, रेणुका कान्हेकर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. ग्रुप दांडिया स्पर्धेत रोख ३१ हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक नटराज ग्रुप, द्वितीय २१ हजाराचे शिवशक्ती ग्रुप, तर आदर्श ग्रुपने ११ हजाराचे तृतीय पारितोषिक मिळविले. ‘मिसेस सेलू’ स्पर्धेमध्ये नूतन विद्यालयातील शिक्षिका आरती कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय कल्पना कदम, तर तृतीय पारितोषिक श्रुती ठाकूर यांनी मिळविले. विजेत्यांना अनुक्रमे रोख ११ हजार, सात हजार व पाच हजार रुपयाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. उत्कृष्ट दांडिया स्पर्धेतील विजेत्या नेहा कुंदनानी, शुभांगी लांडगे, भाग्यश्री हेलसकर, शीतल सोनवणे, सुमन मेहता आदींना पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट वेशभूषा साठी सीमा काळबांडे, मीना पद्मावत, साक्षी उन्हाळे, वैशाली लांडगे, गीतांजली यांना,तर उत्कृष्ट इंस्टाग्राम स्पर्धेसाठी अस्मिता मोरे, हेमा जोशी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिमा असलेल्या सेल्फीपॉईंटवर देखील महिलांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनात वनिता चाफेकर, रूपाली ठाकूर, बबीता ठाकूर, मंजुषा शेलगांवकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Actress Sonalee Kulkarni :  '' मी सुंदर दिसते, कारण...'': सेलूतील महिलांशी सोनालीचा दिलखुलास संवादग्रुप दांडिया स्पर्धेत रोख ३१ हजार रुपयाचे प्रथम पारितोषिक नटराज ग्रुप, द्वितीय २१ हजाराचे शिवशक्ती ग्रुप, तर आदर्श ग्रुपने ११ हजाराचे तृतीय पारितोषिक मिळविले. ‘मिसेस सेलू’ स्पर्धेमध्ये नूतन विद्यालयातील शिक्षिका आरती कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, द्वितीय कल्पना कदम, तर तृतीय पारितोषिक श्रुती ठाकूर यांनी मिळविले. विजेत्यांना अनुक्रमे रोख ११ हजार, सात हजार व पाच हजार रुपयाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!