MPSC : डॉ.माया वाकळेंची पशुधन विकास अधिकारी पदासाठी निवड

MPSC : डॉ.माया वाकळेंची पशुधन विकास अधिकारी पदासाठी निवड

परतूर जि.जालना : येथील डॉ.माया दिपक वाकळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत पशुधन विकास अधिकारी वर्ग एक पदासाठी निवड झाली. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. डॉ. माया यांनी पदवीचे शिक्षण पशुैद्यकीय व पशुविद्यान महाविद्यालय, परभणी येथून पूर्ण केले आहे. पदव्युत्तर शिक्षण भारतीय पशुैद्यकीय संशोधन संस्था, इजतनगर बरेली (उत्तरप्रदेश) येथून पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात नुकतेच पूर्ण केले. २०२२ मध्ये परोपजीव शास्त्रात सर्वोच्च गुण घेणाऱ्या डॉ.माया यांना ज्येष्ठ पशुैद्यकीय प्रतिष्ठान मराठवाडा तर्फे आयोजित कार्यक्रमात सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. या यशाबद्दल माया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!