डॉ.पारनेरकर महाराज पुरस्काराने महादेव आगजाळ सन्मानित

डॉ.पारनेरकर महाराज पुरस्काराने महादेव आगजाळ सन्मानित

डॉ.विष्णु महाराज पारनेरकर यांच्यासह पूर्णवाद परिवाराची मोठी उपस्थिती

सेलू (जि.परभणी) :येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे ग्रंथपाल महादेव आगजाळ यांना डॉ.पारनेरकर महाराज स्मृती ग्रंथालय भूषण सेवाव्रती पुरस्कार शनिवारी, २१ ऑक्टोबररोजी पारनेर (जि.नगर) येथील सरस्वती महोत्सवात प्रदान करण्यात आला.‌ डॅा.पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने हा महोत्सव आयोजिण्यात आला.‌ याप्रसंगी विद्यासागर डॉ.विष्णु महाराज पारनेरकर, ॲड.गुणेश पारनेरकर यांच्या हस्ते आगजाळ यांना सन्मानित करण्यात आले. डॅा.पारनेरकर महाराज स्मृती सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथमित्र, ग्रंथालय भूषण सेवाव्रती व ग्रंथोपजिवी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सत्काराला उत्तर देतांना महादेव आगजाळ म्हणाले, की ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मला ग्रंथालयाच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळाली. वाचनातून सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी घडावा, याच उद्देशाने आजवर माझे प्रयत्न राहिले आहेत. यानिमित्ताने महाराज आणि थोरामोठ्यांचे आर्शीवाद लाभले आहेत. या प्रसादरूपी पुरस्काराचे श्रेय वाचन चळवळीत सक्रीय असलेल्या प्रत्येकाचे आहे. या वेळी तिलोत्तमा गोडबोले, ॲड.प्रभा कातनेश्वरकर, शुभांगी ब्रम्हे, अर्चना आगजाळ, राजेंद्र जवळेकर, आकाश आगजाळ आदींसह पूर्णवाद परिवाराची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!