श्रीराम प्रतिष्ठानच्या आई महोत्सवाला मोठा प्रतिसाद

श्रीराम प्रतिष्ठानच्या आई महोत्सवाला मोठा प्रतिसाद

सेलूतील डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाचा उपक्रम : तीन हजारांवर महिलांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन

सेलू जि.परभणी : नवरात्र महोत्सवानिमित्त सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान व डॉ.संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आई महोत्सवातील विविध कार्यक्रमांना ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी, २२ ऑक्टोबररोजी समारोप झाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा पारवे, प्रा.महादेव साबळे, प्रकाश गजमल, भरत रोडगे, संजय गटकळ, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.‌‌

महोत्सवाचे तिसरे वर्ष आहे. महोत्सवाअंतर्गत स्त्रीशक्तीचा जागर घडविण्यात आला. शिंदे टाकळी, रवळगाव, गोहेगाव, शिराळा डिग्रसवाडी आदी १९ गावातील शेकडो महिलांनी मंठा येथील रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला. देवीची प्रतिमा देऊन महिला व युवतींचा सन्मान करण्यात आला. रविवारी समारोपप्रसंगी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी गोंधळ, जागरण, समूह नृत्य, वेशभूषा आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी डॉ.रोडगे यांनी संवाद साधत स्त्रीशक्तीचे महत्त्व सांगितले. महोत्सवात सरपंच आश्विनी पवार, मयुर वाघ, प्रभाकर उकलकर, संजय गटकळ, गणेश रोडगे, दत्ताराव लाटे, दुर्गादास आळशे, उद्धवराव खेडेकर, कैलास पवार, वसंतराव खेडेकर, योगेश खेडेकर, भास्कराव घोडके, सुदाम माने आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!