Sports : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे सेलूत शानदार उद्घाटन

Sports : आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे सेलूत शानदार उद्घाटन

आंतरमहाविद्यालय क्रिकेट स्पर्धेतूनच भारतीय संघाचे भावी खेळाडू घडतात, असे प्रतिपादन माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी केले‌. 

सेलू जि.परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड झोन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन २८ ऑक्टोबररोजी झाले.

सेलू येथील मैदानावर अनेक उत्कृष्ठ क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धात अनेक रणजी खेळाडू खेळून भारतीय क्रिकेट संघात त्यांनी स्थान मिळवले, असे हरिभाऊ लहाने म्हणाले. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर होते. सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, संदीप लहाने, प्राचार्य डॉ. यु.सी.राठोड, डी झोन समितीचे सचिव प्रा.डॉ.मिनानाथ गोमचाळे, प्रा.साहेबराव देवकते, प्रा.मदन ठाकूर, प्रा.डॉ.संतोष कोकीळ, सतिश नावाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वामी रामानंद तीर्थ व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.कमलाकर कदम यांनी केले. कोठेकर अध्यक्षीय समारोप केला. नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, पोलिस उपनिरीक्षक अशोक जटाळ, भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, प्रा.प्रवीण सोनवणे, प्रा.दयानंद जामगे यांच्या उपस्थितीत नूतन महाविद्यालय सेलू विरुद्ध नागनाथ महाविद्यालय औंढा नागनाथ दरम्यान सामना झाला. औंढा नागनाथ संघ ७६ धावाने विजय प्राप्त केला. बोर्डीकर मैदानावर दुसरा सामना न्यू मॉडेल कॉलेज हिंगोली विरूद्ध सरस्वती फार्मसी महाविद्यालय कुर्तडी दरम्यान होऊन कुर्तडी संघाने ६ गडी राखून विजय प्राप्त केला. तिसरा सामन्यात शिवाजी महाविद्यालय परभणी संघाने १५ षटकात १९८ धावा केल्या, तर गुरुबुध्दी महाविद्यालय पुर्णा संघ २४ धावांत तंबूत परतला. शिवाजी महाविद्यालय १७४ धावांनी विजयी झाला. स्पर्धेत १० महाविद्यालय संघाने सहभाग नोंदविला आहे. सूत्रसंचालन प्रा.राजाराम झोडगे यांनी केले. आभार नागेश कान्हेकर यांनी मानले. स्पर्धेस पंच म्हणून राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, सुरज शिंदे, कपिल ठाकुर, मिर्झा अवेज, वसीम भाई, अक्रमभाई, जिशान सिद्दीकी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी गणेश माळवे, प्रा.रविंद्र कदम, प्रा.श्रीकांत देशमुख, प्रा.प्रविण खरात, संतोष शिंदे, दत्ता रिठ्ठे आदींनी सहकार्य केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!