Maratha Reservation : रवळगावतील साखळी उपोषणाला मोठा प्रतिसाद
सेलू जि.परभणी : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून रवळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने जगदंबा देवी मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा शनिवारी चौथा दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपोषणाला प्रारंभ झाला. रवळगांव व गोहेगांव येथील आंदोलनकर्ते उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. नारायण रोडगे, निशिकांत रोडगे, माणिकराव रोडगे,उत्तमराव रोडगे,गणेश आदाबे, दत्तराव गाडेकर, लक्ष्मण रोडगे, भागवत ढवळे, अमोल रोडगे, सुरेश गिरी,भगवान सपाटे, सर्जेराव रोडगे, सुनिल रोडगे, भागवत गटकळ, शिवाजी गटकळ, सोपान गटकळ, दत्ता जावळे, विनायक गटकळ, संजय गटकळ, अर्जूनशिंदे, पांडुरंग उकलकर, राजेभाऊ गटकळ, हरीचंद्र गटकळ, उध्दव गटकळ, दीपक गटकळ, गोविंद गटकळ, विनायक जावळे, संजय गटकळ, सचिन वाडेकर, किशन शिंदे आदीसह अनेकांनी सहभाग घेतला आहे. या वेळी माजी सरपंच सुरेशराव रोडगे, सरपंच दिपकराव रोडगे, भानुदासतात्या रोडगे,विजय रोडगे, नामदेव रोडगे, प्रल्हाद रोडगे, उत्तमराव रोडगे, गजानन रोडगे उपस्थित होते.