Free Asthma Medicine : दम्याच्या २३५ रुग्णांना मोफत औषधी
श्रीसंतगोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेचा उपक्रम, शेजारच्या जिल्ह्यांतील रुग्णांनीही घेतला लाभ
सेलू जि.परभणी : येथील श्रीसंतगोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त २३५ रुग्णांना दम्याची मोफत औषधी वाटप करण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही दमा (अस्थमा) रूग्णांना उपयुक्त ठरणार्या औषधीचे मोफत वाटप मठ संस्थान परिसरात करण्यात आले. बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील रुग्णांनीही औषधीचा लाभ घेतला. रुग्णांनी औषधाच्या पॅकेटसोबत गायीचे दुध, मातीचे पात्र, मुळ्याची भाजी रूग्णांना मोफत वितरीत करण्यात आली. औषधी सेवन करण्याची पद्धत व पाळावयाची पथ्ये याबाबतीत भगवान पावडे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले
यशस्वीतेसाठी गोसेवक राजेंद्र करवा, सुरेंद्र तोष्णीवाल, शिवनारायण मालाणी, सूर्यकांत जाधव, कृष्णा काटे, अशोक शेलार, गोविंद शेलार, श्रीनिवास काबरा, विजय पांडे, बबलू दायमा, आनंद सोनी, मनोहर महाराज रत्नपारखीआदींसह मठ संस्थान, गोशाळा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.