Maratha Reservation : निपाणी टाकळीतील साखळी उपोषणाला प्रतिसाद

Maratha Reservation : निपाणी टाकळीतील साखळी उपोषणाला प्रतिसाद

सेलू जि.परभणी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ निपाणी टाकळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला रविवारी, २९ ऑक्टोबररोजी सुरुवात झाली. उपोषणाला आजुबाजुच्या गावातील समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. रघुत्तम आजबे, चंपत आजबे, अविनाश शिंदे, डॉ.शिवाजी शिंदे, आनंद आजबे, नितिन आजबे, धनंजय आजबे, लक्ष्मण शिंदे, किरण शिंदे, शिवाजी ढगे, गणेश शिंदे, लखन शिंदे, दत्ता शिंदे बापूराव शिंदे आदींसह‌ निपाणी टाकळी, करडगाव, आंबेगाव, गोगलगाव, काजळी रोहिणा आदी गावातील मराठा समाज बांधव उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!