Maratha Reservation : आरक्षणासाठी सेलूमध्ये जोरदार रास्ता रोको

Maratha Reservation : आरक्षणासाठी सेलूमध्ये जोरदार रास्ता रोको

सकल मराठा समाज बांधवांसह महिलांचा मोठा सहभाग, घोषणाबाजीने परिसर दणाणला, बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरी आदी सुविधांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देऊन सक्षम करणे गरजेचे आहे. परंतु, राज्य व केंद्र सरकार या आंदोलनाची गांर्भीयाने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे, असे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार दिनेश झांपले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, यानिमित्ताने सेलू शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला‌.

सेलू जि.परभणी : मराठा समाजाला सरकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सेलू येथील रायगड कॉर्नरवर सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी, ३१ ऑक्टोबररोजी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे दीड-दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. 

सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू झाले. या वेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. ‘एक मराठा, लाख मराठा’ यासह आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. तहसीलदार दिनेश झांपले यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.‌ निवेदनात म्हटले आहे, की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू आहे. मराठा समाज हा ९९ टक्के अल्पभूधारक असून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठी आहे. आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरी आदी सुविधांपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देऊन सक्षम करणे गरजेचे आहे. परंतु, राज्य व केंद्र सरकार या आंदोलनाची गांर्भीयाने दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठींबा आहे. या वेळी पोलिस बंदोबस्त चोख होता. यानिमित्ताने सेलू शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला‌.


Maratha Reservation : “आरक्षण मिळेपर्यंत शाळा नाही”▪️पावडे हदगाव शाळेत विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!