Table Tennis : परभणीच्या बाल विद्या मंदिरला सुवर्ण पदक

Table Tennis : परभणीच्या बाल विद्या मंदिरला सुवर्ण पदक

राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा : राष्ट्रीय स्पर्धेसाठी परभणीच्या संघाची निवड

परभणी : क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा ३० व  ३१ ऑक्टोबर दरम्यान नांदेड येथे संपन्न झाल्या. यामध्ये परभणी येथील बाल विद्या मंदिर शाळेच्या संघाने सुवर्ण पदक पटाकावले.

बाल विदया मंदिर संघाने छत्रपती संभाजीनगर विभागचे प्रतिनिधित्व करत मुंबई, नागपूर विभागास मात करून अंतिम फेरीत पुणे विभागास ३-१ सेट मध्ये पराभव करत सुवर्ण पदकांचा दावेदार ठरला. संघात शिवनंदन पुरी, तनिष्कराज प्रधान, रुद्र पाटील, श्रीपाद कोठेकर, सोहम मोरे या खेळाडूंचा समावेश आहे. डी.पी.पंडित, प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांचे संघाला मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी नांदेड जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परभणी जिल्हा टेबल टेनिस सचिव गणेश माळवे, सहसचिव डी.पी.पंडीत, खेलो इंडिया प्रशिक्षक चेतन मुक्तावार उपस्थित होते. संस्था सचिव डॉ.विवेक नांवदर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, संजय मुंढे, शैलेंद्र सिंग गौतम यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!