ग्रामपंचायत : निवडणुकीनंतरही शिंदेटाकळीमध्ये प्रशासकराज सुरुच ; सरपंचासह सदस्यांचे बेमुदत उपोषण

ग्रामपंचायत : निवडणुकीनंतरही शिंदेटाकळीमध्ये प्रशासकराज सुरुच ; सरपंचासह सदस्यांचे बेमुदत उपोषण

सार्वत्रिक निवडणूक होऊन दहा महिने झाले, तरी सेलू तालुक्यातील शिंदेटाकळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकामार्फेत प्रशासकराज सुरू आहे. या विरोधात सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. बेमुदत उपोषणाचा मंगळवारी, ३१ ऑक्टोबररोजी दुसरा दिवस होता.‌

सेलू जि.परभणी : सार्वत्रिक निवडणूक होऊन दहा महिने झाले तरी सेलू तालुक्यातील शिंदेटाकळी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकामार्फेत प्रशासकराज सुरू आहे. या विरोधात सरपंच उपसरपंचासह सदस्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. बेमुदत उपोषणाचा मंगळवारी, ३१ ऑक्टोबररोजी दुसरा दिवस होता.‌

या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. शिंदेटाकळी येथील ग्रामपंचायतीत नवीन पदाधिकारी व सदस्य निवडीला २० ऑक्टबर रोजी १० महीने झाले. परंतु, निवडणुकीच्या आचारसंहिता काळात प्रशासक म्हणून ग्रामसेवक होते आणि ग्रामपंचायतीत दोन कर्मचारी कामकाज पाहत होते. ग्रामसेवकांनी अद्यापही शासकीय साहित्य, सामानाचा ताबा दिलेला नाही. नवीन पदाधिकारी निवड झाल्यापासून ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन, अर्ज देवून पाठपुरावा केला. पण कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजस्तव आमरण उपोषणाला बसावे लागले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. या वेळी उपस्थित सरपंच अश्विनी कैलास पवार, कैलास बाबासाहेब पवार, उपसरपंच नंदा रामेश्वर पवार, संतराम गंगाधर पवार, सुंदर शंकरराव पवार, मोहन ज्ञानोबा राऊत, रमेश मच्छिंद्र पवार, विलास विनायक पवार, रमेश दौलतराव पवार, सदाशिव आबासाहेब पवार आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!