सेलूतील सुयश देशपांडे यांचा साहित्य पुरस्काराने सन्मान
परभणी : ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या २०२२ या वर्षातील श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सेलू् येथील लेखक सुयश यशवंत देशपांडे यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांच्या ‘पयोधरीचा निसर्गप्रेमी अभ्र’ या पुस्तकाची बालविभाग पुरस्कारासाठी निवड झाली. सुप्रसिद्ध लेखक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते ठाणे येथे या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी संस्थेचे कार्यावाह दुर्गेश आकेरकर, पदाधिकारी उपस्थित होते. सुयश देशपांडे नवी मुंबई सिडकोमध्ये स्थापत्य अभियंता आहेत. पुरस्काराबद्दल देशपांडे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.