Maratha Reservation : सेलूतील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; राजवाडीत वयोवृद्धांचे उपोषण
कवडधन, मोरेगावमध्ये कॅंडल मार्चला प्रतिसाद, जिल्हाभरात आंदोलने सुरूच
सेलू तालुक्यातील राजवाडी येथील सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणामध्ये मंगळवारपासून दोन वयोवृधद बांधवानी आमरण उपोषण सुरू केले. हरिप्रसाद चिमाजी काष्टे वय 60 आणि मुरलीधर नामदेवराव काष्टे वय 65 वर्षे यांचा यामध्ये समावेश आहे. या बाबत निवेदनाव्दारे तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. कवडधन, मोरेगावमध्ये बुधवारी सायंकाळी कॅंडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
सेलू जि.परभणी : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सेलू येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ साखळी उपोषणातच चार आंदोलकांनी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यातील प्रसाद महाराज काष्टे व जयसिंग शेळके यांची प्रकृती खालवल्यामुळे बुधवारी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. भाऊसाहेब झोल व एकनाथ बोरूळ यांनाही थकवा जाणवत आहे. बुधवारी डॉ.संतोष चव्हाण, डॉ.गजानन कोंडावार यांच्या पथकाने आंदोलनकर्त्यांची तपासणी केली. तहसीलदार दिनेश झांपले यांच्यासह अनेकांनी अन्नत्याग उपोषण थांबवून साखळी उपोषण करण्याची विनंती आंदोलकांना भेटून केली आहे.
सेलू तालुक्यातील राजवाडी येथील सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणामध्ये मंगळवारपासून दोन वयोवृधद बांधवानी आमरण उपोषण सुरू केले. हरिप्रसाद चिमाजी काष्टे वय 60 आणि मुरलीधर नामदेवराव काष्टे वय 65 वर्षे यांचा समावेश आहे. या बाबत निवेदनव्दारे तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. कवडधन, मोरेगावमध्ये बुधवारी सायंकाळी कॅंडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी जिल्ह्यात बुधवारी (१ नोव्हेंबर) रास्ता रोको, थाळीनाद आदी पध्दतीने आंदोलनने सुरुच आहेत. आहे. पाथरीमध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आले. जिंतूर तालुक्यातील बोरी व पंचक्रोशीतील विविध गावांतील मराठा बांधवांच्या वतीने जिंतूर- परभणी महामार्गावर कौसडीफाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. परभणी येथे मंगळवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये महिलांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून प्रशासनाकडे नोंद झालेल्या आंदोलनानुसार २३ मोर्चे,३२२ साखळी उपोषणे, ३४० गावबंदी ठराव, एक ट्रॅक्टर मोर्चा, ४२२ निवेदने ८२ ठिकाणी मतदानावर बहिष्कार, कॅण्डल मार्च, १६ रास्ता रोको, बेमुदत उपोषणे आदी विविध मार्गांनी आंदोलने सुरूच आहेत. मात्र, परभणी जिल्ह्यात यापेक्षाही जास्त आंदोलने झाली आहेत, अनेक गावाच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे आल्या नाहीत, असा दावा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.
जिल्ह्यात २६ ऑक्टोबरपासून प्रशासनाकडे नोंद झालेल्या आंदोलनानुसार २३ मोर्चे,३२२ साखळी उपोषणे, ३४० गावबंदी ठराव, एक ट्रॅक्टर मोर्चा, ४२२ निवेदने ८२ ठिकाणी मतदानावर बहिष्कार, कॅण्डल मार्च, १६ रास्ता रोको, बेमुदत उपोषणे आदी विविध मार्गांनी आंदोलने सुरूच आहेत. मात्र, परभणी जिल्ह्यात यापेक्षाही जास्त आंदोलने झाली आहेत, अनेक गावाच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे आल्या नाहीत, असा दावा सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे.