विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव ; सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयाचा उपक्रम
सेलू जि.परभणी : भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त सेलू् येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित वाचन सप्ताह उपक्रमांतर्गत विविध स्पर्धेतील विजेत्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष एम.आर.पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अनुपमा जवळेकर, श्री के.बा.विद्यालयाचे सचिव महेश खारकर, रामराव गायकवाड, चंद्रशेखर मुळावेकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते ज्ञानेश्वरी रासवे, अंजली लोणकर, सोहम उंडे, पार्थ चौधरी, पोर्णिमा बनसोडे, सान्वी हेलसकर, सायली धापसे, गायत्री जाधव, वक्तृत्व स्पर्धा : अक्षरा पवार, आर्या मालशेटवार, संस्कृती ताठे, प्रतीक्षा मोगल, नंदिनी मालशेटवार, साक्षी चव्हाण, सामान्यज्ञान स्पर्धा : एन.एम.देशपांडे, रविंद्र मुळावेकर, नारायण ईक्कर, प्रकाश धामणगावकर, विलास घुगे यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कविसंमेलनात सहभागी बालकवींचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी डॉ.गंगाधर गळगे, सर्जेराव लहाने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अनंत मोगल यांनी केले. ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके, अमोल बिडवे, काशीनाथ पल्लेवाड, कीर्ती राऊत, सुभाष मोहकरे, बाबासाहेब हेलसकर, भाग्यश्री धामणगावकर, कीर्ती अंबेकर, सुरेश हिवाळे, योगेश ढवारे, सुयोग साळवे, धनश्री देशमुख आदींनी परिश्रम घेतले.