Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी पायी लाँगमार्च

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी पायी लाँगमार्च

परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन 

परभणी : आरक्षणासाठी पूर्णा तालुक्यातील आजदापुरपासून परभणीपर्यंत सकल धनगर समाजबांधवांच्या वतीने गुरुवारी, दोन नोव्हेंबर रोजी क्रांतीमशाल पायी लाँगमार्च काढण्यात आला होता. सकल धनगर समाज बांधव हातात पिवळे झेंडे घेवून व क्रांतीमशाल पेटवून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश असल्यामुळे संंवैधानिक आरक्षणाची अंमलबजावणी करून एस.टी.चे जात प्रमाणपत्र तात्काळ द्यावेत. धनगर आरक्षणावर सरकारने तात्काळ बैठक आयोजित करून प्रश्न मार्गी काढावा, असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात सुरेश भुमरे, आनंद बनसोडे, राजेश बालटकर, नारायण वैद्य आदींससह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!