शिंदेटाकळीच्या सरपंचासह सदस्यांचे उपोषण मागे; बीडीओंचे लेखी आश्वासन

शिंदेटाकळीच्या सरपंचासह सदस्यांचे उपोषण मागे; बीडीओंचे लेखी आश्वासन

सेलू जि.परभणी : ग्रामपंचायत कार्यालयातील शासकीय साहित्य व सामानाचा ताबा माजी सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी द्यावा, या मागणीसाठी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण गुरुवारी, दोन नोव्हेंबररोजी रात्री मागे घेण्यात आले.

बेमुदत उपोषणामध्ये सरपंच अश्विनी पवार, कैलास पवार, उपसरपंच नंदा पवार, संतराम पवार, सुंदर पवार, मोहन राऊत, रमेश पवार, विलास पवार, रमेश पवार, सदाशिव पवार आदींचा समावेश होता. दरम्यान सायंकाळी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सेलू बाजार समितीचे संचालक डॉ.संजय रोडगे, विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर आदींनी उपोषणार्थींशी चर्चा केली.

गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले. विस्तार अधिकारी पंचायत यांनी जायमोक्यावर जावून चौकशी केली आहे. या सोबत सदरील अहवालाची प्रत आपणास देण्यात येत असून तात्कालीन ग्रामसेवक श्री जुकटे यांनी पाच दिवसात अहवालानुसार साहित्य ग्रामपंचायतला देणार असल्याचे लेखी पत्राद्वारे नमूद केले आहे. पाच दिवसांत साहित्य उपलब्ध करून न दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,असेही गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!