Maratha Reservation : सेलू्तील बेमुदत उपोषण मागे; साखळी उपोषण सुरूच 

Maratha Reservation : सेलू्तील बेमुदत उपोषण मागे; साखळी उपोषण सुरूच 

सेलू : मराठा आरक्षणासाठी सेलू येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणात गेल्या सहा दिवसांपासून चार आंदोलकांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते. गुरुवारी, २ नोव्हेंबररोजी सहाव्या दिवशी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. 

जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, एकनाथ बोरुळ, भाऊसाहेब झोल यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषणामध्ये सहभाग घेतला होता. गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण मागे घेतले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी प्रशांत महाराज लातूरकर, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक समाधान चवरे, पत्रकार डॉ.विलास मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सेलूतील बेमुदत आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. या वेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. शुक्रवारी साखळी उपोषणाचा पंधरावा दिवस आहे. या आंदोलनामध्ये सकल मराठा समाज बांधवांचा मोठा सहभाग आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!