Sports : तलवारबाजी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी वेदांत सराफची निवड
सेलू : संत जनार्दन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चारठाणा येथील वेदांत सराफ या खेळाडूची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा ५ ते ८ नोव्हेबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर येथे होत आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चव्हाण, नामदेव चव्हाण, रामभाऊ चव्हाण, राज्य तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.पांडुरंग रनमाळ, राज्य टेनिस व्हाॅलीबाॅलचे सचिव गणेश माळवे परभणी जिल्हा योगासन संघटनेचे डी.डी.सोन्नेकर, प्रशांत नाईक, संजय भुमकर, मुख्याध्यापक एस.आर. महाजन क्रिडा विभागप्रमुख आर.एस.राठोड. संतोष शिंदे,जुलाहा खुद्दूस, राजेश राठोड आदींसह विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.