Sports : प्रा.राजेश राठोड यांची क्रिकेट संघ व्यवस्थापकपदी निवड
सेलू : येथील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील क्रीडाशिक्षक राजेश राठोड यांची स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ अंतर्गत डीझोन मुले क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. सेलू येथील नूतन महाविद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धा नुकत्याच उत्साहात झाल्या. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत डीझोन क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाल्या.डीझोन सचिव प्रा.मिनानाथ गोमचाळे, प्रा.कमलाकर कदम, प्रा.नागेश कान्हेकर, श्रीकांत देशमुख, क्रीडाशिक्षक डी.डी.सोन्नेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, प्रशांत नाईक, सतीश नावाडे, संतोष शिंदे, किशोर ढोके, संदीप लहाने, संजय भुमकर, राहुल शिंदे, अनुराग अंबाटी, अनिकेत आनंदे आदींची उपस्थिती होती.