हिस्सी ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व; सरपंचपदी भाग्यश्री गोरे विजयी
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार
परभणी जिल्ह्यातील हिस्सी (ता.सेलू) ग्रामपंचायतील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ.संजय रोडगे, ॲड.दत्ताराव कदम आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील इळेगाव, लिंबाळा व हिस्सी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. सेलू तालुक्यातील हिस्सी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्ष प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनलने नऊ पैकी सात जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे, तर थेट सरपंचपदी पॅनलच्या भाग्यश्री दिपक गोरे (८०५ मते) यांचा दणदणीत विजय झाला आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार मेघना साकोरे -बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास परिवर्तन पॅनलने निवडणूक लढविली. पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये अर्चना गोरे धोंडीराम गोरे (२६२ मते) संपत रामभाऊ मगर (२०४), अहिल्या साळकीराम गोरे (२३६), सुदामाती भीमराव कवडे (१९३), माणिक रामा शिंदे (२७६), सुदाम यादवराव मगर (२८८), सुनीता धम्मपाल साळवे (२९०) यांचा समावेश आहे.
नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सोमवारी, ६ नोव्हेंबररोजी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, बाजार समिती संचालक डॉ.संजय रोडगे, कपिल फुलारी, गणेश काटकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बालासाहेब मगर, रघुनाथ मगर नारायण बोरकर, गणेश बोरकर मधुकर कवडे, विठ्ठल गात, भास्कर गात, सुभाष शिंदे, दत्ता आळशे, संतोष गात, बालासाहेब गात, दत्ताराव जाधव, प्रशांत नाईक, नारायण जाधव, विकास नाईक, अनिल कांगणे, जीवन महाजन आदींनी पुढाकार घेतला.