दुर्घटना : मशीनमध्ये चेंदामेंदा होऊन मजुराचा मृत्यू

दुर्घटना : मशीनमध्ये चेंदामेंदा होऊन मजुराचा मृत्यू

सेलू्जवळील कोहिनूर रस्सी कारखान्यातील दुर्घटना

मृत मजुर संदीप हातागळे विवाहित होते. त्यांना शेती नव्हती. कला शाखेची पदवी व डीएड पदविका अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला होता. उपजिवीकेसाठी कोहिनूर रस्सी कारखान्यामध्ये मजुरीचे काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे करजखेडा पुनर्वसन वसाहतीवर शोककळा पसरली आहे

सेलू जि.परभणी : रस्सी बनवण्याचे एक्स्टोजन लाइन चालू मशीनमध्ये काम करीत असतांना मशिनमध्ये अडकून एका मजुराच्या शरीराचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. सेलू शहराजवळील खुपसा शिवारातील कोहिनूर रस्सी कारखान्यामध्ये सोमवारी, ६ नोव्हेंबररोजी रात्री अकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

संदीप अशोक उर्फ आसाराम हातागळे (वय ३७, रा.करजखेडा पुनर्वसन ता.सेलू) असे मृत मजुराचे नाव आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत संदीप हातागळे हे सेलू शहरापासून चार किलोमीटरवरील खुपसा शिवारातील कोहीनूर रस्सी कारखान्यामध्ये रात्रपाळीत काम करीत होते. सोमवारी रात्री अकरा ते बाराच्या सुमारास रात्रपाळी दरम्यान काम करीत असतांना कारखान्यातील रस्सी बनवण्याचे एक्स्टोजन लाइन चालू मशीनमध्ये काम करीत असतांना मशिनमध्ये अडकून त्यांच्या शरीराचा छिन्नविच्छीन अवस्थेत चेंदामेंदा झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नाना दामोधर हातागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सेलू् पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी एक वाजता नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मामीलवाड, सूर्यवंशी तपास करीत आहेत. दरम्यान, मृत संदीप हातागळे विवाहित होते. त्यांना शेती नव्हती. कला शाखेची पदवी व डीएड पदविका अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला होता. उपजिवीकेसाठी कोहिनूर रस्सी कारखान्यामध्ये मजुरीचे काम करीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे करजखेडा पुनर्वसन वसाहतीवर शोककळा पसरली आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!