NH548B : सेलू रेल्वे स्थानकापर्यंत महामार्ग वाढवा; दबाव गटाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना साकडे 

NH548B : सेलू रेल्वे स्थानकापर्यंत महामार्ग वाढवा; दबाव गटाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांना साकडे 

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले निवेदन 

अमृत स्थानक योजनेअंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला. राष्ट्रीय महामार्गाचे काम स्थानकापर्यंत वाढविल्यास शहराच्या लौकिकात अधिक भर पडणार आहे. या रस्ते कामाचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत करण्यासाठी संबंधीत विभागाचे अभियंता, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सेलू जि.परभणी : जिल्ह्यातील सेलू शहरातून गेलेल्या चौपदरी ५४८ (ब) राष्ट्रीय महामार्गाचे बसस्थानकापर्यंत सुरू करण्यात आलेले काम सेलू रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने केंद्रिय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी ( १७ नोव्हेंबर) निवेदन पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले-सेलू शहर-पाथरी रेल्वे गेट या साडेपाच किलोमीटर लांबीच्या सिमेंट क्रॉंकिटच्या रस्त्याचे काम सध्या चालू आहे. हे काम बसस्थानक पर्यंतच वाढविण्यात आले आहे. चौपदरी रस्त्यामुळे वाहतुक सुकर व सोयीची होणार असून शहराची शोभाही वाढणार आहे.‌ बसस्थानकपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय तसेच रेल्वे स्थानक केवळ पाचशे मीटरवर आहे. अमृत स्थानक योजनेअंतर्गत सेलू रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला. राष्ट्रीय महामार्गाचे काम स्थानकापर्यंत वाढविल्यास शहराच्या लौकिकात अधिक भर पडणार आहे. त्यामुळे या रस्ते कामाचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत करण्यासाठी संबंधीत कार्यालयास आदेशित करावे व त्यासाठी वाढीव निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर दबाव गटाचे समन्वयक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ इसाक पटेल, विलास रोडगे, ॲड.टी.ए. चव्हाण, गुलाब पौळ, सतीश काकडे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, अजित मंडलिक, मुकुंद टेकाळे, ॲड.देवराव दळवे, गणपत मिटकरी, राजेंद्र केवारे, नारायण पवार, ॲड.योगेश सुर्यवंशी, ॲड. उमेश काष्टे, रौफभाई, आबासाहेब भुजबळ, गणेश सोळंके, महादेव, लोंढे, उद्भव सोळंके, दत्तराव कांगणे, भारत खंदळे, रामचंद्र आघाव, चिंतामण दौड, लिंबाजी कलाल, मतिन दादामियाँ, लिंबाजी कलाल, अशोक कलाल, उत्तम गवारे, जलालभाई, दिलीप शेवाळे, ॲड.पांडुरंग आवटी, शिवाजी खेडकर आदी सदस्यांच्या सह्या आहेत.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!