Kho-Kho Tournament : परभणीमध्ये राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात; पुणे, मुंबई, नाशिकची विजयी सलामी
५९ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : पुणे, मुंबई, नाशिक, धाराशिव सोलापूरच्या पुरुष व महिला संघांची विजयी सलामी
परभणी : कै.प्रा.यु.डी.इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोलापूर, धाराशिव, नाशिक, पुणे व मुंबईच्या पुरुष आणि महिला संघानी प्रतिस्पर्धी संघावर डावाने विजय मिळविले.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने परभणी जिल्हा हौशी खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केली आहे. सकाळच्या सत्रातील सर्व सामने एकतर्फी झाले. महिला गटात सरिता दिव्या (नाशिक), रेश्मा राठोड ( ठाणे), श्रेया संगरे (रत्नागिरी), प्राजक्ता बनसोडे, भाग्यश्री काळे ( सोलापूर), निशा वसावे, ऋतुजा खारे, गौरी शिंदे (धाराशिव) साक्षी पाटील, रिया चाफे (सांगली) वैष्णवी वाघ, स्नेहल जाधव (पुणे), सेजल यादव (मुंबई) यांनी अष्टपैलू खेळ करीत संघाचा विजय सहज साकारला.
पुरुष गटात विजय शिंदे (धाराशिव) रोहित पोद्दार, कुशाल बनसोडे (सोलापूर), निखिल वाघ (ठाणे), राहुल मंडल ( पुणे), दिलीप खांडवी (नाशिक), वेदांत देसाई (मुंबई), अक्षय भांगरे (मुंबई उपनगर) यांनी अष्टपैलू कामगिरी करीत संघास सहज विजय मिळवून दिला
सकाळच्या सत्रातील डावाने झालेले निकाल पुढील प्रमाणे : महिला : नाशिक वि.वि. नांदेड २१-२, ठाणे वि. वि.परभणी १२-८, रत्नागिरी वि. वि. लातूर २१-८, सोलापूर वि. वि. नंदुरबार १६-५. धाराशिव वि. वि. जळगाव २३-६, सांगली वि. वि. हिंगोली १६-५, पुणे वि. वि.सिंधुदुर्ग १८-३, मुंबई वि. वि. बीड १६-५.
पुरुष : धाराशिव वि. वि. जालना १९-६, सोलापूर वि. वि. हिंगोली १५-६, ठाणे वि. वि. लातूर १६-७, पुणे वि. वि. रायगड १८-९, नाशिक वि. वि. नांदेड १४-७, मुंबई वि. वि. सातारा १९-३, मुंबई उपनगर वि. वि. सिंधुदुर्ग १८-१०.
परभणी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जामकर स्पर्धा सचिव डॉ.संतोष सावंत, सचिव डॉ. पवन पाटील, मैदान समिती प्रमुख तथा कार्याध्यक्ष डॉ.संतोष कोकीळ संजय मुंढे, प्रकाश टाकळे, सागर सुडके, रंजीत जाधव, राम चौकट अनिल नलावडे, अंगद खटिंग प्रा. राजेसाहेब रेंगे, डॉ.प्रशांत सराफ डॉ. राजेश्वर देशमुख, प्रा.हेमंत शिंदे, डॉ.आत्माराम टेकाळे, डॉ.मीनानाथ गोमचाळे, प्रवीण चाळक, किशोर ढोक, मुजाहिद, रवी उबाळे, सुशील देशमुख, कृष्णा शिंदे, योगेश जोशी शेख कलीम, कृष्णा शिंदे, कृष्णा साळवे, संजय भुमरे, शंकर शहाणे, गणेश माळवे भारतीय खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ.चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र गोकुळ संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, डॉ.पवन पाटील डॉ. संतोष कोकीळ, श्रीराम चौकट अरुण देशमुख, डॉ.प्रशांत इनामदार श्री प्रकाश टाकले आदींची उपस्थिती होती.