दिवाळी अंक वाचण्याचा आनंद काही औरच : तहसीलदार दिनेश झांपले

दिवाळी अंक वाचण्याचा आनंद काही औरच : तहसीलदार दिनेश झांपले

सेलू्तील स्वामी रामानंद तीर्थ ग्रंथालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

दिनेश झांपले म्हणाले की, दिवाळी अंकातील साहित्यातून संस्कार, संस्कृतीची रुजवणूक होते. विनोदी साहित्य वाचनाचा आनंद औरच असतो.‌ मोबाईलच्या युगात ज्ञान समृद्ध करण्यासाठी दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.

दिवाळी अंक वाचण्याचा आनंद काही औरच : तहसीलदार दिनेश झांपले

सेलू जि.परभणी : सेलू् येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार दिनेश झांपले यांच्या शनिवारी (१८ नोव्हेंबर) हस्ते झाले. प्रदर्शनाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष एम.आर.पटेल होते. उद्योजक महेश खारकर, गंगाधर गुंजंकर, चंद्रशेखर मुळावेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.‌ या वेळी दिनेश झांपले म्हणाले की, दिवाळी अंकातील साहित्यातून संस्कार, संस्कृतीची रुजवणूक होते. विनोदी साहित्य वाचनाचा आनंद औरच असतो.‌ मोबाईलच्या युगात ज्ञान समृद्ध करण्यासाठी दिवाळी अंक वाचण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.” महेश खारकर म्हणाले, “आपल्या संस्कृतीचा अंगिकार व्हावा. यासाठी दिवाळी अंक असतात. संस्कार आणि सुसंस्कृत बनवणारी दिवाळी अंकातील वैविध्य पूर्ण साहित्याचा वाचनाचा आनंद घ्यावा.” प्रास्ताविक चंद्रशेखर मुळावेकर , सूत्रसंचालन प्रा.अनंत मोगल, तर अमोल बिडवे यांनी आभार मानले. ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडित जगाडे , विलास शिंदे, अनिरुद्ध टाके, अविनाश जोगे, सुयोग साळवे, डॉ.गंगाधर गळगे, प्रकाश धामणगावकर, नारायण इक्कर , रविंद्र मुळावेकर, गंगाधर खेबाळे, जी.एस.चौधरी, सदाशिव भालेराव , शरद ठाकर, सदाशिव महाजन, डॉ.भूषण फरकंडेकर आदींसह वाचकांची मोठी उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!