Gopashtami : गोपाष्टमीनिमित्त सेलूमध्ये गोदिंडी उत्साहात

Gopashtami : गोपाष्टमीनिमित्त सेलूमध्ये गोदिंडी उत्साहात

श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेमध्ये उत्सव

Gopashtami : गोपाष्टमीनिमित्त सेलूमध्ये गोदिंडी उत्साहात

सेलू जि.परभणी : येथील श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ गोशाळेच्यावतीने गोपाष्टमीनिमित्त पारंपरिक गोपूजन गोदिंडीचे सोमवारी, २० नोव्हेंबर रोजी उत्साहात आयोजन करण्यात आले.

गोसेवक सुरेंद्र तोष्णीवाल, वल्लभ राठी, जयप्रकाश झंवर, मधुकर आनंदे, प्रकाश करवा, अविनाश बिहाणी यांच्या हस्ते मनोहर महाराज रत्नपारखी यांनी सदगुरू श्री संत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या पावन भूमीत शास्त्रोक्त मंत्रोच्चार करून गौपूजन केले. गोमातेला साज-श्रृंगार करून स्टेशन रोड, जवाहर रोड, मोंढा, क्रांती चौक मार्गे गोमातेची नगर परिक्रमा दिंडी काढण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, शामसुंदर मालाणी, सुभाष सोनी, द्वारकादास करवा, गोविंद भुतडा, नंदलाल परतानी, जगदीश भुतडा, निवास बाहेती यांनी ठिकठिकाणी गोमातेचे पूजन केले. श्री रोकडिया हनुमान मंदीर प्रभात परिक्रमा मंडळ, श्री केशवराज बाबासाहेब प्रभात मंडळ, सार्वजनिक महिला भजनी मंडळ यांनी नगरपरिक्रमा दिंडीत सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगन्नाथ पवार, सूर्यकांत जाधव, कृष्णा काटे, अक्षय हुगे, कृष्णा करवा, विजय पांडे, गणेश बागडे, गोविंद डालिया, बबलू मंडलिक, शिवनारायण मालाणी, अशोक शेलार, श्रीनिवास काबरा, राजेंद्र करवा, सुयश पटवारी, व्यंकटेश काबरा आदी गोसेवकांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!