इज्तेमा : सेलूतील इज्तेमा धार्मिक कार्यक्रम उत्साहात

इज्तेमा : सेलूतील इज्तेमा धार्मिक कार्यक्रम उत्साहात

मौलाना साद अब्दुला यांचे मार्गदर्शन : मुस्लिम समाज बांधवांची मोठी उपस्थिती, स्वयंशिस्तीचे दर्शन 

इज्तेमा : सेलूतील इज्तेमा धार्मिक कार्यक्रम उत्साहात

एक चांगला मुस्लिम म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी कर्म चांगले करा. गरीब लोकांची मदत करा, प्रामाणिकपणे व कष्टाने कमाई करा. मोबाईल, इंटरनेटच्या दुष्परिणामांची जाणीव ठेवून व्यसनांपासून दूर राहा. प्रेषित मोहमद पैगंबरांच्या जीवनशैलीचा अंगिकार करावा, असे आवाहन नांदेडचे मौलाना साद अब्दुला यांनी या वेळी मार्गदर्शन करतांना केले.

सेलू जि.परभणी : सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांचा दोन दिवसीय इज्तेमा धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मंगळवारी, 21 नोव्हेंबररोजी सायंकाळी तीन जोडपे विवाहबद्ध झाले. मुस्लिम समाजाने पैगंबरांच्या जीवनशैलीचा अंगिकार करावा, असे आवाहन मौलाना साद अब्दुला यांनी या वेळी मार्गदर्शन करतांना केले.

सेलू् शहरातील फुरखानिया मदरसाजवळील मैदानावर तालुकास्तरीय इज्तेमाचा समारोप झाला. यावेळी दुवाप्रसंगी नांदेडचे मौलाना साद अब्दुल्ला यांनी मार्गदर्शन केले. पैगंबरांची शिकवण, शरियतची माहिती, एक मुस्लिम म्हणून पार पाडावयाच्या सामाजिक जबाबदाऱ्या, उच्च शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षणाची गरज, व्यसन,मोबाईल, इंटरनेट चे दुष्परिणाम आदी विषयांवर मौलाना यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मौलाना म्हणाले, प्रेषित मोहमद पैगंबरांनी सांगितले आहे, की ज्या देशात राहता. त्या देशाच्या कायद्याचे पालन करणे बंधन आहे. पाच वेळा नमाज, रोजा, हज, जकात करणे आवश्यक आहे, वृद्ध आई वडिलांचे पालनपोषण करा, दैनंदिन गरजा पूर्ण करून ईश्वराचा विसर पडू देऊ नका. पवित्र कुराणचे वाचन करा. मुस्लिमचे खरे जग आखिरत आहे. त्या बद्दल विचार करा. कर्म चांगले करा. एक चांगला मुस्लिम म्हणून ओळख निर्माण करा. गरीब लोकांची मदत करा, प्रामाणिकपणे व कष्टाने कमाई करा. यावेळी जगामध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे. त्यासाठी अल्लाहकडे मदत मागा. सर्व जगामध्ये शांतता नांदवी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. इज्तेमास्थळी अल्पोपहार, चहा, पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली. माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, अशोक काकडे आदींसह मानवत, सेलू, पेडगाव, वालूर परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांची उपस्थिती होते. इज्तेमासाठी मौलाना तज्जुमल, मौलाना सादेक नदवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!